संकेश्वर : कर्नाटक कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संकेश्वर पोलीस व पालिका प्रशासनाने अचानक आज (मंगळवारी) विनाकारण व विनामास्क बाहेर फिरणा-यांची अँटिजन तपासणी केली. यामध्ये संशयित तिघांना कोविड काळजी केंद्रात पाठविण्यात आले.
कर्नाटक सरकारने ७ जूनअखेर लॉकडाऊन लागू केला असतानाही काही दुचाकीस्वार विनाकारण शहरातून फेरफटका मारत आहेत.
दरम्यान, पोलीस, आरोग्य व पालिकेच्या पथकाने हुक्केरी रोडवर विनाकारण व विनामास्क फिरणा-या १०३ नागरिकांचे स्वॅब घेतले. त्यातील १०० जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार असून त्याचा अहवाल ५ दिवसांनी मिळणार आहे. या तपासणीत तिघेजण संशयित आढळले आहेत.
--------------------------
फोटो ओळी : संकेश्वर येथे पालिका, पोलीस व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विनाकारण बाहेर पडणा-या नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली.
क्रमांक : ०१०६२०२१-गड-०५