ज्योतिबा : ज्योतिबा दर्शनासाठी आणि वीकेंड पर्यटनासाठी आलेल्या भाविक व पर्यटकांची गिरोली मार्गावर अँटिजन चाचणी करण्यात आली. प्रत्येक रविवारी ही अँटिजेन चाचणी मोहीम राबविण्यात येणार आहे, याची भाविक, पर्यटकांनी नोंद घ्यावी. गिरोलीमार्गे ज्योतिबाला जाणाऱ्या भाविकांची अँटिजन चाचणी करुन त्यांना त्याचा अहवाल सांगून घरी पाठविण्यात आले.
सुमारे १०० जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. या सर्व चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. केखले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ज्योतिबा प्राथमिक उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली. ज्या लोकांनी मास्क घातले नव्हते, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सकाळी नऊच्या सुमारास चाचणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी कोडोली पोलीस स्थानकाचे निरीक्षक दिनेश काशिद, गिरोलीचे पोलीस पाटील मोहन कदम, ज्योतिबाचे पोलीस पाटील बाळासाहेब पाटील, डॉ. प्रियांका शेट्टी, डॉ. नीता मोहिते, शशिकला धंगेकर, दिगंबर मगर उपस्थित होते. कडक लॉकडाऊनमुळे ज्योतिबा डोंगराच्या सर्व प्रवेश नाक्यांवर कोडोली पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.