कोल्हापूर : अतिक्रमण निर्मूलन मोहिमेवेळी विभागप्रमुख पंडित पोवार यांना माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांच्याकडून दमदाटी करून शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला; पण त्याबाबत पोलिसांत तक्रार कोणी द्यायची? कोणी उघड-उघड विरोध करायचा? याबाबत स्पष्टता नसल्याने मंगळवारी ‘फक्त’ एकमेकांना निवेदन देणे आणि चर्चा करण्यातच दिवस सरला; तर पोवार यांनाच तक्रार देण्याबाबत आवाहन केल्याचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळास सांगितले.
दरम्यान, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या प्रकरणी व्यक्तिश: लक्ष घालावे अन्यथा कोणत्याही क्षणी काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महापालिका कर्मचारी संघाच्या वतीने महापौर आणि आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे महापालिकेचे पदाधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांची महापौर स्वाती यवलुजे यांनी आज, बुधवारी सकाळी ११ वाजता महापालिकेत बैठक आयोजित केली आहे.
शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना विभागप्रमुख पंडित पोवार यांना अनेक आजी-माजी नगरसेवकांच्या विरोधाच्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. ९ मार्च रोजी पाचगाव रस्त्यावर हनुमाननगरजवळ एक अनधिकृत केबिन उचलताना माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांनी पंडित पोवार यांना दमदाटी व शिवीगाळ केली. याबाबत पोवार यांनी याबाबतचे रेकॉर्डिंग आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि कर्मचारी संघटनेकडे देऊन लेखी तक्रार केली. त्याची दखल घेऊन कर्मचारी संघटनेने मंगळवारी सकाळी महापौर स्वाती यवलुजे यांना निवेदन देऊन शिवीगाळ करणाºयावर कारवाई करावी; अन्यथा कोणत्याही क्षणी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर सायंकाळी कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या ताराबाई पार्क निवडणूक कार्यालयात आयुक्त चौधरी यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले. त्यावेळी आयुक्त चौधरी यांनी, पंडित पोवार यांना फौजदारी दाखल करण्याबाबतच्या सूचना दिल्या असून, त्यांच्या पाठीशी आपण असल्याचा खुलासाही केला. त्यावेळी अतिक्रमण मोहिमेवेळी अनेक वेळा हे वादावादीचे प्रकार घडत असल्याने यामुळे कर्मचाºयांचे खच्चीकरण होत असल्याचे कर्मचारी संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
या शिष्टमंडळात, कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, दिनकर आवळे, अजित तिवले, अनिल साळोखे, बाळू चौगुले, रमेश पोवार, लक्ष्मण दाभाडे, सुनील गोहिरे, कुंदन लिमकर, पांडुरंग लगारे, धनाजी खिलारे, सिकंदर सोनुले, कृष्णात रुईकर, आदी उपस्थित होते.बंद खोलीत अडीच तास चर्चादमदाटी केल्याप्रकरणी मंगळवारी शिवाजी तरुण मंडळाच्या कार्यालयात शिवाजी पेठेतील काही ज्येष्ठ व्यक्तींनी माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांना बोलावून जाब विचारला. या प्रकरणाला वेगळे वळण लागू नये म्हणून अजित राऊत, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, सदाभाऊ शिर्के, राजू चोपदार या मोजक्याच व्यक्तींनंी बोंद्रे आणि पोवार यांच्यात बंद खोलीत सुमारे अडीच तास समोरासमोर बैठक घडवून आणली. यावेळी बैठकीत, ज्या व्यक्तीशी बोललो तो व्यक्ती पंडित पोवार असल्याचे मला माहीत नसल्याचा खुलासा यावेळी बोंद्रे यांनी केला; तर हे प्रकरण आता महापालिका कर्मचारी संघटनेकडे गेल्याने तेच याबाबत निर्णय घेतील, असा निर्णय पोवार यांनी दिला...तरच अतिक्रमण निर्मूलन मोहीमपुरेसा पोलीस बंदोबस्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित असल्याशिवाय येथून पुढे अतिक्रमण निर्मूलनची कारवाई केली जाणार नाही. अतिक्रमण निर्मूलन मोहिमेवेळी अडथळ्यांबद्दल कायदेशीर कारवाईची हमी प्रशासनाने द्यावी, अशीही मागणी संघटनेच्या व महापालिका कर्मचारी संघाच्या वतीने आयुक्त चौधरी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.