लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील स्वयंप्रेरिका संस्थेतर्फे’ सरोजिनीदेवी विश्वनाथ पाटील तथा काकीजी यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त ३० वर्षावरील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी घेतलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अपर्णा महादेव भंडारी (रा. कळंबा) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना सरोज चषक व अडीच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. स्पर्धेत २४ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
स्पर्धेत दुसरा क्रमांक शिवानी केदार गुळवणी तर गीता अरुण कुलकर्णी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे दोन व दीड हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रायोजकत्व माधवराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ डॉ. अनिल देशपांडे (आजरा), कोल्हापूर यांनी स्वीकारले. या स्पर्धेसाठी जीएसटी अधिकारी चारुशीला दीपक काणे व निवेदिका ऐश्वर्या शशांक बेहरे यांनी परीक्षण केले. संस्थेचे हितचिंतक व देणगीदार कै. टी. डी. कुलकर्णी यांच्या कन्या सौ. नयना पाटकर व अनिल पाटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशपांडे परिवारातर्फे मिलन होळणकर व स्नेहल कारंडे या उपस्थित होत्या. वाणीमुक्ती गीत सुप्रिया देशपांडे, आशा थोरवत आणि मृण्मयी सोनाळकर यांनी सादर केले. प्रास्ताविक अध्यक्षा जयश्री गायकवाड यांनी केले. तृप्ती पुरेकर व दीपलक्ष्मी राऊत यांनी स्वागत केले. सौम्या तिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले.
२१०७२०२१-कोल-स्वयंमप्रेरिका कार्यक्रम
कोल्हापुरातील स्वयंप्रेरिका संस्थेत सरोजिनीदेवी विश्वनाथ पाटील यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त तीस वर्षावरील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी घेतलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच झाला.