आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि.२४ : ‘गोकुळ’ने आपल्या कार्यकर्तृत्वाने राज्यातच नव्हे तर देशपातळीवर नावलौकिक मिळविला आहे. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीबरोबरच ग्रामविकासाचे मोठे काम संघाने केल्याचे गौरवोद्गार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.
राज्य सरकारच्या (मेढा)वतीने पुणे येथे ‘गोकुळ’ला ऊर्जाबचतीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. दूध उत्पादकांनी किफायतशीर व शास्त्रशुद्ध दूध व्यवसाय करावा, यासाठी दूध उत्पादकांच्या गोठ्यापर्यंत विविध योजना पोहोचविण्याचे काम केले. सहकारात आदर्शवत काम केल्याबद्दल राज्य सरकारने सलग तीन वर्षे ‘सहकार भूषण’ पुरस्काराने गौरव केल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. ‘ऊर्जाबचतीचा पुरस्कार मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्वीकारला.
यावेळी ‘मेढा’चे महाप्रबंधक राजाराम माने, आमदार मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, अनिल स्वामी, डी. डी. पाटील आदी उपस्थित होते. राज्य सरकारच्यावतीने पुणे येथे ऊर्जा बचतीच्या प्रथक क्रमांकाच्या पुरस्काराने ‘गोकुळ’ला गौरविण्यात आले. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी ‘मेढा’चे महाप्रबंधक राजाराम माने, आमदार मेधा कुलकर्णी, संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, अनिल स्वामी, डी. डी. पाटील आदी उपस्थित होते.