शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Kolhapur: महिला सुरक्षेसाठी माणगाव ग्रामपंचायतीने तयार केले अ‍ॅप; कसं होणार संरक्षण, सुविधा काय..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 4:19 PM

अभय व्हनवाडे  रुकडी/माणगाव : नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या माणगाव ग्रामपंचायतीने आता महिला व बाल सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाच्या आधारे अ‍ॅप ...

अभय व्हनवाडे रुकडी/माणगाव : नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या माणगाव ग्रामपंचायतीने आता महिला व बाल सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाच्या आधारे अ‍ॅप तयार केले आहे. सध्या महिला व बालिकेवर राज्यामध्ये विविध ठिकाणी अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटना‌ घडू नये व घडल्यास त्याची तात्काळ माहिती कळावी व संरक्षण मिळावे याकरिता या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.महिला व बाल सुरक्षासह आत्मसंरक्षणासाठी मोबाईलमध्ये माणगाव ग्रामपंचायतकडून 'निडली एसओएस' हे अ‍ॅप उपलब्ध करून दिले जात आहे. कोणीही मोबाईल हिसकावून घेत पॅटर्न अनलॉक करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा फोटो आपोआप निघणार. झटापटी दरम्यान अथवा अडचणीच्यावेळी चार वेळा पावर बटन दाबण्याचा किंवा ॲपमधील एसओएस बटन दाबल्यास मोबाईल धारकांच्या कुटुंबातील चार सदस्यांना ती व्यक्ती जिथे आहेत तिथली माहिती मिळण्याची सुविधा तयार करण्यात आली आहे. याशिवाय घटनेची तीव्रता पाहून तात्काळ महिला अत्याचार प्रतिबंधक पोलीस विभागाकडील ११२ नंबरला संपर्क करण्याची सुविधा देण्यात आली आहे.माणगाव ग्रामपंचायतीने मुलींच्या विवाहाप्रसंगी माहेरीची साडी, रूकवत भांडी संच, मुलगी जन्मल्यास कन्या सन्मान योजना राबविले असून आता महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन अॅपची सुविधा उपल्ब्ध केल्याने नागरिकांमधून स्वागत होत आहे.

माणगाव येथील महिलांना सुरक्षा देण्याकरिता या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. शिवाय या अ‍ॅपचा वापर सर्वांना करता येणार आहे. याचा सर्व खर्च माणगाव ग्रामपंचायत करणार आहे. भविष्यात यामध्ये आणखीन काही सुविधा देता येतील का यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. - डॉ. राजू मगदूम, सरपंच 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतWomenमहिला