कोल्हापूर : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या असमान निधी योजनेंतर्गत इच्छुकांनी योजनेसाठीचा प्रस्ताव जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास ८ जानेवारीपर्यंत पाठवावा, असे आवाहन ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांनी केले आहे.
ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन, फर्निचर, इमारत बांधकाम -विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसाहाय्य, ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी, महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी, राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनासाठी तसेच बाल ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरिता अर्थसाहाय्य दिले जाते. तरी इच्छूकांनी www.rrrif.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
--
इंदुमती गणेश