अमर पाटील
कोल्हापूर: कुटुंबच काय देश चालविण्याची क्षमता महिलांच्यात असल्याने विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केले. कळंबा येथील अमृत सिद्धी मंगल कार्यालयात आयोजित ४७-कोल्हापूर लोकसभा प्रवास संपर्क यात्रा अभियान कारेक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी आमदार अमल महाडिक होते. मराठ्यांचा कर्तृत्वशाली इतिहास महाराष्ट्रा पुरता मर्यादित नसून देशाला आदर्शवत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जगातील पाचवी महासत्ता असणारा भारत येत्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेत केंद्रस्थानी असेल त्यासाठी लोकसंख्येच्या समप्रमाणात असणाऱ्या महिलांनी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सबलीकरनासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या असून त्याचा लाभ सर्वसामान्य महिलांनी घेऊन त्याचा प्रचार व प्रसार करण्याची व्याप्ती वाढवावी असे मत व्यक्त केले. पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्राकडून तात्काळ निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी त्यांनी केंद्रीय मंत्री सिंधिया यांना व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार अमल महाडिक,महानगर जिल्हाअध्यक्ष राहुल चिकोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाडगे, माजी जिल्हा परिषद सदस्या संध्यारणी बेडगे, मनीषा टोनपे यांसह पक्षाचे महिला पदाधिकारी उपस्थित होते. फोटो मेल केले आहेत फोटो ओळ १) कळंबा येथील सांस्कृतिक कार्यालयात आयोजित लोकसभा प्रवास यात्रा महिला संपर्क अभियान कारे