शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

Kolhapur Politics: अप्पी पाटील, नंदाताईंच्या विधानसभा उमेदवारीला 'महाविकास'मधून विरोध; गडहिंग्लज येथील बैठकीत एकमत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 1:42 PM

चंदगडमधून इच्छुकांची गर्दी

राम मगदूमगडहिंग्लज : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात पुन्हा सक्रिय झालेल्या डॉ. नंदिनी बाभूळकर, ‘काँग्रेस’मध्ये प्रवेश केलेले जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्या विधानसभेच्या उमेदवारीला एकजुटीने विरोध करण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत एकमताने झाला. मंगळवारी रात्री येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक झाली.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर, काँग्रेसचे विभागीय समन्वयक विद्याधर गुरबे, उद्धवसेनेचे प्रमुख सुनील शिंत्रे, ज्येष्ठ शिवसैनिक रियाजभाई शमनजी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते अमरसिंह चव्हाण, माजी जि. प. सदस्य शिवप्रसाद तेली, धरणग्रस्तांचे नेते कॉ. संपत देसाई, कॉ. संजय तर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकसभा निवडणुकीपूर्वी गडहिंग्लज विभागात काढलेल्या ‘संविधान बचाव दिंडी’मुळेच भाजप सरकारविरोधी वातावरण तयार झाले. दिंडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांनी गावोगावी संपर्क मोहीम राबवली. त्यामुळेच खासदार शाहू छत्रपती यांना चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतून भरघोस मते मिळाली, असा दावाही बैठकीत केला.

शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांऐवजी लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी सक्रिय झालेल्यांस उमेदवारी दिल्यास जनतेचा पाठिंबा मिळणार नाही. त्यामुळे नेहमी जनसंपर्कात असणाऱ्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरण्याचा आणि त्यासाठी जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांची भेट घेण्याचा निर्णयही यावेळी झाला.

'यांच्या' उमेदवारीसाठी आग्रह लोकसभा निवडणुकीपर्यंत अप्पी पाटील व डॉ. बाभूळकर हे लोकसंपर्कापासून दूर होते. त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य कुणालाही उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्याचेही ठरले. महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला जागा मिळाल्यास अमरसिंह चव्हाण, काँग्रेसला मिळाल्यास गोपाळराव पाटील, शिवसेनेला मिळाल्यास सुनील शिंत्रे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरण्याचे ठरले.

उमेदवारीचे दावेदार एकत्र

राष्ट्रवादीतील फुटीनंतर चंदगडविधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच होण्याची अपेक्षा असतानाच उमेदवारीचे दावेदार बहुसंख्येने एकत्र आले आहेत.

चंदगडमधून इच्छुकांची गर्दीराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर व माजी सभापती अमरसिंह चव्हाण, दौलतचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील व गडहिंग्लजचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे, उद्धवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, ज्येष्ठ शिवसैनिक रियाज शमनजी, बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील ही मंडळी इच्छुक आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीchandgad-acचंदगड