शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल योजना राबवा

By admin | Published: June 27, 2016 10:33 PM

‘आयटक’ची मागणी : प्रांत कार्यालयावर मोर्चा

इचलकरंजी : शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने जाहीर केल्याप्रमाणे यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी घरकुल योजना राबवावी, अशा मागणीसाठी करवीर कामगार संघ-आयटकच्यावतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून सचिन हाके यांना निवेदन दिले.कामगार संघटनेच्या गोकुळ चौकातील कार्यालयापासून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व शंकर पुजारी, हणमंत लोहार, मारुती आजगेकर यांनी केले. मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यावर प्रवेशद्वारावर तो पोलिसांनी अडविला. निवेदन दिल्यानंतर शंकर पुजारी, शंकर आडावकर, मारुती आजगेकर, हणमंत लोहार, आदींची भाषणे झाली. शासन कामगारांच्या घरकुल, आरोग्य विमा, कामगार कल्याण मंडळ अशा योजनांकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल वक्त्यांनी टीका केली.मोर्चासमोर बोलताना पुजारी म्हणाले, यंत्रमाग कामगारांबरोबर जॉबर, दिवाणजी, कांडीवाले, सायझर, वार्पर, हेल्पर, फायरमन, वहिफणी, कामगार, आॅटोलूम कामगार, गारमेंट व प्रोसेसिंग उद्योगातील कामगार अशा सर्वांनाच शासनाच्या योजनांचा फायदा मिळावा. मालेगाव महापालिकेप्रमाणे इचलकरंजी नगरपालिकेने कामगारांच्या घरकुल योजनेबाबत सर्वसाधारण सभेत प्रस्ताव पारीत करावा. लक्ष्मण चव्हाण यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)