बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या एक दिवस अगोदर राष्ट्रीय पक्षांसह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आज, मंगळवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे.सोमवारी महापालिकेत बेळगाव दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदारसंघासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केले. यानिमित्त भाजप व काँग्रेस समर्थकांनी चन्नम्मा चौकातून रॅली काढली. न्यायालयाच्या परिसरातील गर्दीमुळे काही काळ वाहतूकीची कोंडी झाली. भाजपच्यावतीने बेळगाव उत्तर मतदारसंघासाठी अनिल बेनके यांनी, तर ‘दक्षिण’साठी अभय पाटील यांनी, ग्रामीणमधून संजय पाटील यांनी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केले. काँग्रेसच्यावतीने बेळगाव ‘दक्षिण’मधून एम. डी. लक्ष्मी नारायण यांनी, तर उत्तर मतदारसंघातून फिरोज सेठ यांनी अर्ज दाखल केले.किणेकर यांचे शक्तिप्रदर्शनबेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार म्हणून माजी आमदार मनोहर किणेकर यांनी अर्ज दाखल केला. तालुका म. ए. समिती कार्यालयाजवळून त्यांनी रॅली काढली व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी जुन्या मनपा कार्यालयात अर्ज दिला.महाराष्ट्र एकीकरणच्या शहर समितीच्यावतीने किरण गावडे यांनी शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. यानंतर शेकडो युवकांना घेत शक्तिप्रदर्शन करत उमेदवारीचा अर्ज दाखल केला. गावडे यांना नगरसेवक रतन मासेकर, किरण गावडे, किरण सायनाक, पंढरी परब यांना अर्ज भरण्याची सूचना दिली होती.
बेळगावात शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:07 AM