मुरगूड : सोनाळी, ता.कागल येथील सात वर्षांच्या वरदचा दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य याने खून केला आहे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा सर्व पुराव्यांसह तपास करण्यात यावा व महाराष्ट्र शासन गृहखात्याच्या वतीने न्यायालयीन कामासाठी वरदच्या वतीने सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद रवींद्र पाटील (वय ७) या मुलाचाअपहरण करून दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य, रा. सोनाळी याने खून केला.
ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. अद्यापही वरदच्या खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. कोल्हापूर जिल्ह्यात सर्व स्तरावर या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यासाठी वरदच्या खुनाचा तपास कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस दलातर्फे विशेष पथकाकडे देण्यात यावा. या घटनेतील सर्व बाबींची विशेष चौकशी करून वरदच्या मृत्यूचा गुन्हेगार दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असा सर्व पुराव्यासह तपास करण्यात यावा, तसेच महाराष्ट्र शासनाच्या गृहखात्याच्या वतीने न्यायालयीन पुढील कामासाठी वरदच्या वतीने सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, तालुका प्रमुख अशोक पाटील, सत्यजित पाटील, उमाजी पाटील, जीवन रेडेकर, विनय रेडेकर, अनिल पाटील उपस्थित होते.
फोटो ओळ
सोनाळी, ता. कागल येथे वरदच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना विजय देवणे, विनय रेडेकर.