नेमली चौकशी समिती
पन्हाळ्याचे तहसीलदार चौकशी समितीचे अध्यक्ष
१५ सदस्यांची समिती
वाघजाई डोंगर :
प्रकाश पाटील
कोपार्डे : वाघजाई डोंगरावरील जमिनी खरेदी-विक्रीसंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी याची चौकशी करण्याचे आदेश पन्हाळ्याचे प्रांताधिकारी बी. आर. माळी यांना दिले होते. या आदेशानंतर पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय समितीही नेमली. मात्र, या समितीने अद्यापर्यंत कोणतीच चौकशी केली नसल्याने ही समिती कागदावरच असल्याचे दिसून येते. त्यामुळे ही समिती या व्यवहारांची चौकशी कधी करणार? असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. दरम्यान, स्थानिक शेतकऱ्यांकडून धरणग्रस्त व शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी घेण्यात आलेल्या जमिनीची अद्यापही शासकीय मोजणी केलेली नाही. या जमिनीचे नकाशेही काढण्यात आले नसल्याची माहिती आहे.
चौकट : खरेदीदाराकडून कोट्यवधीचे कर्ज उचल
या डोंगरावर खरेदी केलेल्या जमिनीवर एका धनदांडग्याने राष्ट्रीयीकृत बँकेचे दहा कोटी रुपये कर्ज उचलले आहे. विशेष म्हणजे एक हेक्टर ४५ आर या क्षेत्रावर बँकेने हे कर्ज दिले आहे. त्यामुळे इतक्या कमी क्षेत्रावर कोट्यवधीचे कर्ज दिलेच कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.