कोल्हापूर : शहरातील उर्वरित खासगी रुग्णालयांमध्ये बेड वाढविण्यासाठी आणखी १३ आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती केली असून, या आरोग्य निरीक्षकांनी आपापल्या वॉर्डामधील खासगी रुग्णालयांत अधिकाधिक बेड वाढविण्याची सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली.खासगी रुग्णालयात बेड वाढविण्यासाठी तसेच कोविड केअर सेंटर आणि अलगीकरण कक्षामधील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी बैठक घेतली. बैठकीस उपायुक्त विनायक औंधकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार तसेच शहरातील सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडील बेड उपलब्धतेबाबतची दैनंदिन माहिती शासनाने तयार केलेल्या ॲपवर तत्काळ अपलोड करावी, यासाठी आरोग्य निरीक्षकांनी लक्ष देण्याची सूचना आयुक्त कलशेट्टी यांनी केली.याबरोबरच आरोग्य निरीक्षकांनी आपापल्या वॉर्डातील कोविड केअर सेंटर आणि अलगीकरण कक्षामधील आरोग्य सुविधेबाबत अधिक दक्षता घ्यावी, तसेच आरोग्य निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही काम करताना कोरोनाच्या अनुषंगाने आपलीही काळजी घेण्याची सूचनाही आयुक्तांनी केली.
खासगी रुग्णालयात बेड वाढविण्यासाठी आणखीन १३ आरोग्य निरिक्षकांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 6:47 PM
कोल्हापूर शहरातील उर्वरित खासगी रुग्णालयांमध्ये बेड वाढविण्यासाठी आणखी १३ आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती केली असून, या आरोग्य निरीक्षकांनी आपापल्या वॉर्डामधील खासगी रुग्णालयांत अधिकाधिक बेड वाढविण्याची सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली.
ठळक मुद्देखासगी रुग्णालयात बेड वाढविण्यासाठी आणखीन १३ आरोग्य निरिक्षकांची नियुक्ती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची माहिती