कोल्हापूर : महापालिका प्रशासनाने शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी मुलांचे व मुलींचे वसतीगृह, आयसोलेशन हॉस्पिटल, शेंडा पार्क येथील कुटंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, कसबा बावडा येथील अंडी उबवणी केंद्र कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत असून बुधवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी चार नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.
शिवाजी विद्यापीठ वसतिगृह येथे नियंत्रण अधिकारी म्हणून उप आयुक्त-२ रविकांत आडसूळ व वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, शिवाजी विद्यापीठ मुलांचे व मुलींचे वसतिगृह, तंत्रशास्त्र विभागासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून मुख्य लेखापाल संजय सरनाईक व वैद्यकीय अधिकारी प्रकाश पावरा, आयसोलेशन हॉस्पिटल व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र शेंडापार्क येथे नियंत्रण अधिकारी म्हणून सहायक आयुक्त-१ विनायक औंधकर व वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश जाधव, कसबा बावडा अंडी उबवणी केंद्र येथे नियंत्रण अधिकारी म्हणून जलअभियंता नारायण भोसले व वैद्यकीय अधिकारी विद्या हेरवाडे यांची नियुक्ती केली आहे. या चारही केंद्रांवर सर्व आवश्यक ती पूर्वतयारी करण्याच्या सूचनाही बलकवडे यांनी दिल्या आहेत.