कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ७० अनुकंपा कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्राचे वाटप बॅँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. बॅँकेचे ८० मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांची अनुकंपाखाली नियुक्ती करावी, अशी मागणी कर्मचारी युनियनची होती. युनियन सोबत झालेल्या चर्चेनंतर पात्र ७० कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतला.
निकषानुसार ज्यांच्याकडे पदवी अथवा तांत्रिक पदविका आहे, त्यांची लिपिक तर किमान सातवी उत्तीर्ण असणाऱ्यांना शिपाई म्हणून नेमणुका दिल्या. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, संचालक पी. जी. शिंदे, अनिल पाटील, आर. के. पोवार, भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, उदयानी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, प्रशासन व्यवस्थापक जी. एम. शिंदे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.रणवीर चव्हाण यांची आठवणसाखर उद्योगातील कर्तव्यदक्ष व माहिती संपन्न अधिकारी आपण गमावला. बॅँकिंग, साखर उद्योग व उद्योगांमधील अडअडचणीत त्यांचा अभ्यास निष्णात असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.