कोल्हापूर : आई-वडिलांचा सांभाळ दैवत मानून करा. प्रामाणिकपणाने त्यांची सेवा करा, त्यांना कधीही अंतर देऊ नका, लोभापासून दूर राहून लोकांची सेवा करा. असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.जिल्हा परिषदेच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोमवारी शासकीय विश्रामगृहात अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती आदेश देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अनुकंपाचे १२२ प्रस्ताव आले होते, त्यातील ५० जणांची नियुक्ती केली.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महिला बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मनिषा देसाई आदी उपस्थित होते. उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरूण जाधव यांनी आभार मानले.
जिल्हा परिषद दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 4:01 PM
ZP, Hasan Mushrif, Satej Gyanadeo Patil, kolhapur, आई-वडिलांचा सांभाळ दैवत मानून करा. प्रामाणिकपणाने त्यांची सेवा करा, त्यांना कधीही अंतर देऊ नका, लोभापासून दूर राहून लोकांची सेवा करा. असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
ठळक मुद्देआई- वडिलांना दैवत मानून सांभाळ करा - हसन मुश्रीफ अनुकंपा भरतीमध्ये शिथीलता आणणार - सतेज पाटील