कोल्हापूर : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत राज्यातील ३0२ ग्रामपंचायतींच्या इमारती बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.राज्यातील एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ज्या ग्रामपंचायतींना कार्यालयासाठी स्वत:ची इमारत नाही अशा ग्रामपंचायतींच्या इमारती बांधण्यासाठी ही योजना आखण्यात आली होती. ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी या योजनेसाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार सहा महिन्यांपूर्वी प्रस्तावही मागविण्यात आले होते.कोल्हापूर जिल्ह्यातील खालील ग्रामपंचायतींची कार्यालये बांधण्यासाठी या योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे. चांदमवाडी, शिंदेवाडी, न्हाव्याचीवाडी (ता. भुदरगड), बुजवडे, ढेंगेवाडी, रामणवाडी (ता. राधानगरी), गेळवडे, गोंडोली, खेडे, टेकोली, मांजरे, वरेवाडी (ता. शाहूवाडी), पेद्रेवाडी, शेळप (ता. आजरा), लोंघे (ता. गगनबावडा), शंकरवाडी (ता. कागल), तुपूरवाडी (ता. गडहिंग्लज)