लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : गेल्या साडेचार महिने बहुचर्चित ठरलेला कोल्हापूर-सांगली रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरणाचा विषय अखेर सोमवारी मंजूर झाला. पालिकेच्या विशेष सभेत हा रस्ता हस्तांतरणाचा विषय पंधरा विरुद्ध दोन मतांनी मंजूर झाला. सभेस नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व नगरसेवक असे आठजण अनुपस्थित होते.
जयसिंगपूर नगरपालिकेच्या दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता विशेष सभा बोलाविण्यात आली होती. नगराध्यक्षा डॉ. नीता माने व उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर सभेसाठी अनुपस्थित असल्यामुळे नगरसेवक सर्जेराव पवार यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे, असे नगरसेवक शिवाजी कुंभार यांनी सुचविले. त्यास नगरसेवक पराग पाटील यांनी अनुमोदन दिले.
शहरातील कोल्हापूर-सांगली रस्ता नगरपालिकेकडे रस्ता हस्तांतरण करण्याबाबतच्या विषयाचे वाचन झाल्यानंतर ताराराणी आघाडीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगरसेवक शैलेश चौगुले व आसावरी आडके यांनी या रस्ता हस्तांतरणाच्या ठरावाला विरोध दर्शविला. तर शाहू व ताराराणी आघाडीच्या उपस्थित असणाºया नगरसेवकांनी हात उंचावून ठरावास मंजुरी दिली.
यावेळी शहरात विविध ठिकाणी महावितरण अंतर्गत ओव्हरहेड एच.टी. लाईन काढून भुयारी एच.टी. केबल टाकण्याच्या कामास ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देणे या विषयाबाबत प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी नगरसेवक शिवाजी कुंभार यांनी केली. तर नगरसेवक अस्लम फरास म्हणाले, एच. टी. केबल टाकत असताना रस्ता खुदाई झाला, तर तो रस्ता डांबरीकरण करण्याबाबत महावितरणकडून खुलासा करून घ्यावा, असे मत मांडले. या विषयावर चर्चेअंती हा विषय मंजूर झाला.नगरसेवकांची अनुपस्थितीया सभेस उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, नगरसेविका स्वरूपा पाटील-यड्रावकर, दीपा झेले, संगीता पाटील चिंचवाडकर, संजय पाटील-कोथळीकर, संभाजी मोरे, अॅड. सोनाली मगदूम हे अनुपस्थित होते. सभेला नगराध्यक्षा डॉ. नीता मानेदेखील अनुपस्थितीत होत्या. मात्र, त्यांनी मुख्याधिकाºयांकडे अनुपस्थितीचे पत्र दिले होते.
ताराराणीत फूट
कोल्हापूर-सांगली रस्ता हस्तांतरण विषयावरून उपस्थित असलेल्या ताराराणी आघाडीमधील शैलेश चौगुले व आसावरी आडके यांनी विरोध दर्शविला. तर उर्वरित ताराराणीच्या नगरसेवकांनी रस्ता हस्तांतरणाला मंजुरी दिली. त्यामुळे आघाडीतील नगरसेवकात फूट दिसून आली.दोन नगरसेवकांचा विरोध
रस्ता हस्तांतरणाला विरोध असल्याचे सांगत नगसेवक शैलेश चौगुले सभेत म्हणाले, न्यायालयाने नगरपालिका हद्दीतील दारू दुकानप्रश्नी नव्याने निर्णय दिला आहे. तो निर्णय येईपर्यंत रस्ता हस्तांतरणाचा विषय स्थगित ठेवावा. या विषयावर नगरसेवक दोषी ठरू नयेत. तर नगरसेविका आसावरी आडके म्हणाल्या, चौदा वर्षांपूर्वी रस्ता हस्तांतरणाचा विषय आला होता. जयसिंगपूर-वाडी रोड हस्तांतरण होऊन काय सुधारणा झाली. महामार्ग रस्त्याची देखभाल दुरुस्तीचा बोजा जनतेवरच पडणार आहे.हस्तांतरणाला कृती समितीचा विरोधलोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली रस्ता हस्तांतरणाचा ठराव मंजूर झाल्यानंतर शहरातील विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकाºयांनी पालिकेने घेतलेल्या महामार्ग हस्तांतरणाला विरोध दर्शवून पालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी केली. ठराव रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी रस्ता हस्तांतरण विरोधी कृती समितीच्यावतीने देण्यात आला.
दरम्यान, गणेशोत्सवानंतर आंदोलनाचा निर्णय कृती समिती घेणार आहे.आंदोलनात भाजपचे राजेंद्र दार्इंगडे, डॉ. उदयसिंह नाईक, रागिणी शर्मा, जैनुद्दिन अत्तार, राजेंद्र निर्मळ, विठ्ठल पाटील, शिवसेनेचे सूरज भोसले, रतन पडियार, साजिदा घोरी, मनसेचे भगवंत जांभळे, कॉ. रघुनाथ देशिंगे, कॉ. शिवानंद हिट्टीनहळ्ळी संजय वैद्य, जीवन पाटील, अब्दूल बागवान यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. पालिकेसमोर काही काळ तणावपूर्ण वातावरण बनले होते. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.