कोल्हापूर : वृक्षप्रेमी संस्थेकडून नागाळा पार्कातील कनान नगरात हंगामातील पहिले वृक्षारोपण पर्यावरणासाठी राज्यभर सायकल भ्रमंती करणारी प्रणाली चिकटे, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, पर्यावरण तज्ज्ञ सुहास वायंगणकर, माजी नगरसेवक दिलीप पोवार, हसमुख शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी झाले.
यंदाच्या पावसाळी हंगामातील पहिल्या वृक्षारोपण कार्यक्रमात २० प्रकारच्या देशी औषधांची वृक्षलागवड करण्यात आली. यवतमाळ येथील प्रणाली चिकटे ही पर्यावरणपूरक संदेश देण्यासाठी राज्यभरात सायकलवरून भ्रमंती करीत आहे. तिचाही यानिमित्त पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्डे, सतीश कोरडे, अक्षय कांबळे, तात्या गोवावाला, सचिन पोवार, विद्या पाथरे, अर्चना चौगुले, स्नेहा जाधव, अमर पवार, प्रमोद गुरव, विकास कोंडेकर, अमित यादव, शैलेश पोवार, भालचंद्र गोखले, परितोष उरकुडे आदी उपस्थित होते.
फोटो : १४०६२०२१-कोल-ट्री
आेळी : कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थेकडून नागाळा पार्कातील कनान नगरात रविवारी सकाळी शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी व प्रणाली चिकटे यांच्या हस्ते वृक्षाराेपण झाले.