सलग सहाव्या वर्षी युवक मंचच्यावतीने महिला सक्षमीकरण करणे या विचारानुसार खास महिलांसाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गावातीलच सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, उद्योग, व्यवसाय या सर्व क्षेत्रात उठावदार कामगिरी करणाऱ्या दोन महिलांना युवक मंचच्यावतीने दरवर्षी ८ मार्चला सह्याद्री महिला प्रेरणा पुरस्कार जाहीर केले जातात. २०२१ सालातील अर्चना बराले यांना कला व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच वैशाली शेलार यांना घरगुती व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल यंदाचा सह्याद्री महिला प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
अर्चना बराले या स्वतः कराटे तायक्वांदो या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू आहेत. कराटेमधील अनेक बेल्टच्या त्या मानकरीही आहेत. राष्ट्रीय कोच तसेच राष्ट्रीय पंच म्हणूनही कामगिरी केलेली आहे. तसेच गावांमध्ये महिला व मुलींना त्या स्वसंरक्षणाचे धडेही देतात. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी यश संपादन केले आहे.
याबरोबरच वैशाली शेलार यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत घरामध्येच घरगुती व्यवसायाची सुरुवात केली. कुटुंबाला आर्थिक सहकार्य मिळावे यासाठी घरामध्येच मिरची कांडप मशीन, पिठाची गिरण, तसेच शिलाई मशीन याद्वारे त्यांनी घरगुती व्यवसाय सुरू केला आहे. ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामध्ये त्यांचे हे सर्व घरगुती व्यवसाय सुरू आहेत.
युवक मंचच्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. याप्रसंगी मंचचे मार्गदर्शक रवींद्र पाटील, अध्यक्ष युवराज साळोखे, उपाध्यक्ष सतीश चेचर, महादेव पाटील, पिराजी मेथे, बाळासो काटे, उमेश पाटील, भगवान पोतदार, उमेश दिंडे, नितीन देवणे, उत्तम साखळकर, अमर टिटवे, रमाकांत माने, अमर पाटील, अंकुश कदम, राहुल लांडगे, राधेय पंडित आदी सदस्य उपस्थित होते.
फोटो koldesk ला पाठवले आहेत.