लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील आर्किटेक्ट शिरीष बेरी यांनी नागपूरमधील गांधी फार्म हाऊसच्या बनविलेल्या डिझाईनला जयपूर या ठिकाणी जगप्रसिद्ध आर्केशिया सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांना दुसऱ्यांदा या पदकाचा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी सन २०१० मध्ये ‘सार्वजनिक इमारती’ या विभागात त्यांना सुवर्णपदक मिळाले होते.अशियातील २१ देशांच्या आर्किटेक्टच्या संघटनांनी एकत्रित येऊन सन १९९१ मध्ये ‘आर्केशिया’ नावाची संघटना स्थापन केली. या संघटनेतर्फे दरवर्षी प्रत्येक देशात संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी जयपूर येथे संमेलन झाले. यात सर्वोत्तम आर्किटेक्ट-डिझाईनला पारितोषिके देण्यात आली. २१ देशांतून ७०० डिझाईन आली होती. नागपूर येथील गांधी फार्म हाऊसचे डिझाईन बेरी यांनी बनविले होते. या घराचे आराखडे तयार करण्यात आर्किटेक्ट अनुजा कदम यांचा सहभाग होता. घराचे इंटेरिअर डिझाईन विनिता आगे यांनी केले.असे आहे ‘गांधी फार्म हाऊस’धकाधकीच्या जीवनातून नवचैतन्य निर्माण व्हावे, अशी गांधी फार्म हाऊसची रचना केली आहे. या घराची संकल्पना गांधी कुटुंबीयांच्या शेतामधील वड आणि बेहडा या झाडांसभोवती साकारली आहे. वडाचे झाड केंद्रस्थानी ठेवून सभोवती लॅप पूल बांधला आहे. हा पूल वड आणि बेहडा यांना एकत्र जोडण्यास मदत करतो. पर्यावरणपूरक घरासाठी या परिसरात मिळणाऱ्या गेरू रंगाचा अनघड दगड वापरला आहे. या घराचा प्रवेश अरुंद आहे.
शिरीष बेरी यांच्या डिझाईनला आर्केशियाचे सुवर्णपदक
By admin | Published: June 04, 2017 1:34 AM