शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

दोन लाचखोर अधिकाऱ्यांसह आर्किटेक्टला चार वर्षे शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 4:47 PM

बिगरशेती करण्यासाठी चार लाखांची लाच घेणाऱ्या एका आर्किटेक्टसह दोन नगररचनाकार अधिकाऱ्यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी चार वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न दिल्यास ६ महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देदोन लाचखोर अधिकाऱ्यांसह आर्किटेक्टला चार वर्षे शिक्षाजिल्हा न्यायालयाचा निकाल : बिगरशेती करण्यासाठी घेतले चार लाख

सातारा : बिगरशेती करण्यासाठी चार लाखांची लाच घेणाऱ्या एका आर्किटेक्टसह दोन नगररचनाकार अधिकाऱ्यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी चार वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न दिल्यास ६ महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.नगररचनाकार आसाराम मोहनराव चंदनशिव (वय ५५, रा. कोथरुड, पुणे), सहायक नगररचनाकार संजय तानाजी फरांदे (वय ५४, रा. सदर बझार, सातारा), आर्किटेक्ट राहुल हणमंत भोकरे (वय ३२, रा. कमानी हौद, सातारा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी, पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील २८ हजार चौरस मीटर जमीन बिगरशेती करण्याचा प्रस्ताव प्रकाश रघुनाथ माने (वय ५७, रा. शुक्रवार पेठ, फलटण) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिला होता. त्यानंतर हा प्रस्ताव रेखांकन व अभिप्रायसाठी सहायक संचालक नगर रचनाकार कार्यालयात आलेला होता.त्याप्रमाणे रेखांकन व कागदपत्रांची पुर्तता करून अभिप्राय सहायक संचालक यांच्याकडे सादर करण्यासाठी नगररचनाकार चंदनशिव याने २६ सप्टेंबर २०१३ रोजी प्रकाश माने यांच्याकडे सात लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर चंदनशिवने सहायक नगररचनाकार फरांदेला भेटण्यास सांगितले. त्यानंतर फरांदेने माने यांना आर्किटेक्ट भोकरे यांच्याबरोबर चर्चा करण्यास सांगितले.

आर्किटेक्ट राहुल भोकरे यांनी पाच लाख रुपये लाच मागितली. अखेर तडजोडीनंतर चार लाख रुपये देण्याचे ठरले. १७ आॅक्टोबर २०१३ रोजी रात्री आठच्या सुमारास पोवई नाक्यावरील एका इमारतीमध्ये आर्किटेक्ट राहुल भोकरे याच्याकरवी चार लाखांची लाच घेताना चंदनशिव आणि फरांदेला रंगेहाथ पकडण्यात आले होते.तत्कालीन पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सुनावणीवेळी एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. एकही साक्षीदार फितूर झाला नाही. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आसाराम चंदनशिव, संजय फरांदे, राहुल भोकरे यांना चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर