शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

गोकुळमध्ये भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार आहात का..?मुश्रीफ यांची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 12:52 PM

Gokul Milk HasanMusrif Kolhapur- महाराष्ट्रात अनेक प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर भाजप सातत्याने विखारी टीका करत असून सरकार अस्थिर करण्याची व बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही. गोकूळमध्ये अशा भाजपच्या मांडीला मांडी लावून शाहूवाडी तालुक्यातील शिवसेना कशी बसणार अशी विचारणा गोकुळ दूध संघातील विरोधी राजर्षि शाहू आघाडीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी केली.

ठळक मुद्देसरुडकर गटाचा सन्मान महाविकास आघाडीनेच केला माजी आमदार सत्यजित पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान महाविकास आघाडीनेच केला

कोल्हापूर : महाराष्ट्रात अनेक प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर भाजप सातत्याने विखारी टीका करत असून सरकार अस्थिर करण्याची व बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही. गोकूळमध्ये अशा भाजपच्या मांडीला मांडी लावून शाहूवाडी तालुक्यातील शिवसेना कशी बसणार अशी विचारणा गोकुळ दूध संघातील विरोधी राजर्षि शाहू आघाडीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी केली.जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर भाजपचा अध्यक्ष व जनसुराज्य पक्षाचे उपाध्यक्ष झाले. त्यावेळी शाहूवाडी तालुक्यातील शिवसेनेने विनाअट पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. वास्तविक; त्यावेळी हे प्रश्न विचारले गेले पाहिजे होते असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील- सरूडकर यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान महाविकास आघाडीनेच केला असा दावाही मुश्रीफ यांनी केला आहे.गोकुळमध्ये अगोदर सत्यजित पाटील यांनी विरोधी राजर्षि शाहू आघाडीस पाठिंबा दिला.आमदार विनय कोरे यांनीही याच आघाडीला पाठिंबा दिल्याने सरुडकर गटातून प्रतिक्रििया उमटली आहे.

कोरे गटाकडून पन्हाळ्यातून अमर पाटील व काँग्रेसकडून शाहूवाडीतून कर्णसिंह गायकवाड यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही उमेदवार विधानसभेला कोरे यांच्यासोबत राहतात. त्यामुळे गोकुळची ताकद मिळाल्यास आपल्या अडचणी वाढतील असे सरुडकर गटाला वाटते. त्यावरून धुसफूस सुरु आहे. या आघाडीत राहायचे की नाही याचा फेरविचार करावा असा दबाव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी हे स्पष्टीकरण केले आहे.मंत्री मुश्रीफ म्हणतात, सव्वा वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलांमध्ये सत्यजित पाटील यांचे प्रमुख सहकारी हंबीरराव पाटील,भेडसगावकर यांची जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम व आरोग्य सभापतीपदी निवड करून महाविकास आघाडीने त्यांचा सन्मान केला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेत कोणाच्यातरी चिथावणीला बळी पडू नये. सत्यजित पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून गैरसमज दूर केले जातील.

टॅग्स :Gokul MilkगोकुळHasan Mushrifहसन मुश्रीफVinay Koreविनय कोरेSatyajit Patilसत्यजित पाटीलkolhapurकोल्हापूर