शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

धक्कादायक! संपत्तीच्या वाटणीवरून वाद, जेवणात विष घालून सुनेने सासऱ्यास मारले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 11:40 AM

मुलींनाही वारसा हक्काने वाटणी हवी आहे. या पार्श्वभूमीवर सून रूपाली हिने सासऱ्याच्या जेवणात विष घातले.

कागल (कोल्हापूर): बाचणी (ता. कागल) येथील अण्णाजी बापू जाधव (वय ७२) यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांची सून रूपाली दत्तात्रय जाधव (वय ३४) हिला कागल पोलिसांनी काल, गुरुवारी अटक केली.रूपाली हिने जेवणात विष घातल्याने आपल्या पतीचा मृत्यू झाल्याची तक्रार अण्णाजी यांच्या पत्नी शोभा जाधव यांनी कागल पोलिसांत दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली जाधव यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळल्याने कागल पोलिसांनी त्यांना अटक केली.जेवणातून विषबाधेची घटना २७ जुलै रोजी घडली होती. सासू, सासरा, दीर व संशयित आरोपी सून असे सर्व जण एकत्र जेवण करीत असताना अण्णाजी यांना उलट्या सुरू झाल्याने त्यांना दवाखान्यात दाखल केले होते. त्याचा ११ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. संपत्तीच्या वाटणीवरून कुटुंबात वाद सुरु आहे. मुलींनाही वारसा हक्काने वाटणी हवी आहे. या पार्श्वभूमीवर सून रूपाली हिने सासऱ्याच्या जेवणात विष घातले, अशी तक्रार पोलिसांत दिली होती. तपास सहायक पोलीस निरीक्षक मोनिका खडके करीत आहेत.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी