अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) गाव कोरोनामुक्त झाल्याची माहिती उपसरपंच विश्वनाथ कदम यांनी दिली. अर्जुनवाड येथे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत जाहीर केले.
कदम म्हणाले, गेल्या तीन-चार महिने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ग्रामस्थांना सामोरे जावे लागले. याशिवाय सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी सचिन कांबळे, आरोग्य विभागाचे सुनील कांबळे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गंगाई, पोलीस, गटविकास अधिकारी शंकर कवितके, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, खासगी डॉक्टर्स यांनी वेळोवेळी सहकार्य केल्याने गाव कोरोनामुक्त झाले आहे. पुढील काळातही कोरोनामुक्त गाव ठेवण्यास ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
चौकट - २५ बेडचे कोविड सेंटर सुरू करणार
येथील विद्यामंदिर शाळेच्या सभागृहात २५ बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील काळात संभाव्य धोका लक्षात घेऊन लवकरच हे सेंटर उभारणार असल्याचे उपसरपंच कदम यांनी सांगितले.