कोल्हापूर : जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून गोकुळ दूध संघामुळे मंगळवारी सीपीआर, सेवा रुग्णालय व आयसोलेशन या सार्वजनिक रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांनी सुगंधी दूधाचा आस्वाद घेतला. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखालील गोकुळच्या टीमने एक हजार पाकिटे वाटली.यावेळी अध्यक्ष पाटील यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या या काळात शरीराची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी पौष्टिक आहार म्हणून दूधाचा समावेशाची गरज व्यक्त केली. उत्तम आरोग्यासाठी उत्तम गुणवत्तेचे दूध आहारात वापरा, असे आवाहनही त्यांनी केले.
या उपक्रमात सीपीआरचे अधीक्षक डॉ. सत्यवान मोरे, सेवा हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. उमेश कदम,आयसोलेशन हॉस्पिटलचे डॉ. रमेश जाधव, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, अभिजित तायशेटे, एस. आर. पाटील, बयाजी शेळके, मार्केटिंग अधिकारी उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील सीपीआरचे बंटी सावंत अभिषेक डोंगळे, राजवीर नरके यांनी सहभाग घेतला.