निवेदनातील आशय असा, शार्जील उस्मानी याने हिंदू बांधवांबद्दल अपशब्द वापरले असून, धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करावी, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा आणि भाजयुमो प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांच्या माध्यमातून प्रचंड पाठपुराव्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला; परंतु त्याचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यांच्यावर १५३ अ सोबत २९५ अ व इतर तत्सम गुन्हे दाखल होणे अपेक्षित होते; परंतु ते करण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. हिंदूद्वेष्ट्या धर्मांध उस्मानीला त्वरित अटक करून त्याच्यावर २९५अ आणि लागू होणारी सर्व कलमे लावावीत, अशी मागणी केली.
यावेळी विद्यार्थी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष पार्थ प्रवीणसिंह सावंत, विद्यार्थी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष केदार गोरे, सागर पाटील, गणेश खतकर, बाबासाहेब गवस, सुजय पोपळे, आशिष बेळेकर, अभी साळवी, सिद्धार्थ केसरकर, सुशांत नाईक, आदी प्रमुख उपस्थित होते.