शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कळे बॅँक दरोडा आंतरराज्य टोळीच्या दोघा भावांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 11:32 AM

कळे येथील यशवंत सहकारी बँकेत दरोडा टाकून पाऊण कोटी लूट करणाऱ्या सराईत आंतरराज्य टोळीतील दोघा भावांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने अटक केली. चाँदखान अब्दुलनबी नईमखान (वय ४०, रा. इंदिरानगर मरोळ, अंधेरी ईस्ट मुंबई, मूळ, रा. ककराला, ता. दांतागंज, जि. बदायु-उत्तरप्रदेश) त्याचा भाऊ गुड्डू ऊर्फ तसद्दुअल्ली नईमखान (३८, रा. ककराला-उत्तरप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देकळे बॅँक दरोडा आंतरराज्य टोळीच्या दोघा भावांना अटकट्रकसह दरोड्याचे साहित्य जप्त : मुख्य सूत्रधारासह पाच साथीदारांचा शोध सुरू

कोल्हापूर : कळे येथील यशवंत सहकारी बँकेत दरोडा टाकून पाऊण कोटी लूट करणाऱ्या सराईत आंतरराज्य टोळीतील दोघा भावांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने अटक केली. चाँदखान अब्दुलनबी नईमखान (वय ४०, रा. इंदिरानगर मरोळ, अंधेरी ईस्ट मुंबई, मूळ, रा. ककराला, ता. दांतागंज, जि. बदायु-उत्तरप्रदेश) त्याचा भाऊ गुड्डू ऊर्फ तसद्दुअल्ली नईमखान (३८, रा. ककराला-उत्तरप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत.

त्यांच्या ताब्यातून ट्रकसह दरोड्यासाठी वापरत असलेले साहित्य जप्त केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. टोळीचा मुख्य सूत्रधार बाबू खान याच्यासह पाच साथीदार पसार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.टोळीचा मुख्य सूत्रधार बाबू कौसर खान, गुड्डू ऊर्फ कालीया इसराक अल्ली खान, फसाहत ऊर्फ तहजीब आलम खानकल्लुखान, सेहवाज खान, राहुल (सर्व रा. ककराला-धनपुरा, बदायु-उत्तरप्रदेश) यांच्यासह ट्रक चालक चाँदखान नईमखान, त्याचा भाऊ गुड्डू नईमखान यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तरप्रदेश, आदी राज्यांत दरोड्याचा धुमाकूळ घातला आहे. रेकी करून ते दरोडा टाकत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. कळे बँकेतील रोकड आणि सोन्याचे दागिने म्होरक्या बाबू खान याच्याकडे आहे.यशवंत बॅँकेत मोठ्या प्रमाणात रोकड व दागिने आहेत, याचा अंदाज घेत चोरट्यांनी बॅँकेची रेकी करून ७ फेब्रुवारीला दरोडा टाकला होता. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांना एक शाल मिळून आली होती.

तसेच तपास करीत असताना कळे ते कोल्हापूर मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, दरोड्यासाठी पांढऱ्या रंगाच्या ट्रकचा वापर केल्याचे दिसून आले. त्यानुसार ठाणे, भिवंडी, नवी मुंबई या ठिकाणी तपास करून ट्रकचा नंबर (एम. एच. ०४ जीसी ४६९८) प्राप्त केला. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ट्रकच्या मालकाचे नाव, पत्ता मिळविला असता, भिवंडी येथील शहजादे चाँद खान याच्या नावे असल्याचे दिसून आले.

पत्त्यावर चौकशी केली असता, ट्रकचे रजिस्ट्रेशन करण्यापुरता पत्ता वापरला असल्याचे निष्पन्न झाले. सहायक निरीक्षक किरण भोसले, उपनिरीक्षक सचिन पंडित, कॉन्स्टेबल राजेश आडुळकर, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, अजित वाडेकर, नितीन चोथे, रणजित कांबळे या पथकाने भिवंडी, मरोळ, अंधेरी, नवी मुंबई, आदी भागांत ट्रकचालक व मालकाचा शोध घेतला असता, गॅस कटरने बँक दरोडा टाकणारी सराईत टोळी ककराला-उत्तरप्रदेश या ठिकाणी वास्तव्यास असून, त्यांची रेकॉर्डवरील प्राथमिक माहिती मिळाली.

ककराला या ठिकाणी चौकशी केली असता, ट्रकचा मालक चाँद खान व त्याचा भाऊ गुड्डू खान यांची माहिती मिळाली. गुड्डू हा दिल्लीतील भजनपुरा-जमुना विहार भागात अस्तित्व लपवून राहत असल्याबाबत माहिती मिळाली.

दिल्ली येथे चार दिवस पथकाने तळ ठोकून एका महिलेच्या घरात वास्तव्यास असलेल्या गुड्डूच्या मुसक्या आवळल्या. त्याला खाकी दाखविताच त्याने गुन्ह्यात वापरलेला ट्रक भाऊ चाँद खान वापरत असून, तो मुंबईतील इंदिरानगर येथील झोपडपट्टीत राहत असल्याची कबुली दिली. तेथून चाँदला ट्रकसह ताब्यात घेतले.

दोघा भावांकडे चौकशी केली असता, त्यांनी कळे बँकेच्या दरोड्याची कबुली दिली. ट्रकमध्ये शाल, गॅसटाकी, कटावण्या, स्क्रुड्राईव्हर, केमिकल, कटर मिळून आले. त्यांच्या अन्य साथीदारांना चाहुल लागताच ते पसार झाले. या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर