शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

कर्जाच्या आमिषाने फसवणाऱ्या उत्तरप्रदेशमधील भामट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 2:15 PM

प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी फायनान्स कंपनीतून आठ कोटी ४० लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्त बॅँक अधिकाऱ्यास २२ लाख ३७ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या आणखी एका भामट्यास लक्ष्मीपुरी पोलिसांनी रविवारी अटक केली.

ठळक मुद्देकर्जाच्या आमिषाने फसवणाऱ्या उत्तरप्रदेशमधील भामट्यास अटकआठ कोटी ४० लाख कर्जासाठी २२ लाखांचा गंडा प्रकरण

कोल्हापूर : प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी फायनान्स कंपनीतून आठ कोटी ४० लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्त बॅँक अधिकाऱ्यास २२ लाख ३७ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या आणखी एका भामट्यास लक्ष्मीपुरी पोलिसांनी रविवारी अटक केली.संशयित आरोपी अमितकुमार ऊर्फ राहुल गंगाराम कमल (वय २९, रा. रमणीपुरम, उत्तरप्रदेश) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यापूर्वी त्याचा साथीदार अजय गंगादास दास (२२ रा. आर्यनगर, दिल्ली, मूळ बिहार) याला अटक केली होती. सध्या तो कारागृहात आहे.निवृत्त बँक अधिकारी गजानन राजाराम भोसले (६३, रा. संभाजीनगर) यांना उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज हवे होते. वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीनुसार त्यांनी दिल्लीतील एका फायनान्स कंपनीशी ७ नोव्हेंबर, २०१७ रोजी फोन वरून संपर्क साधला.

यावेळी संशयित अजय दास याने तुमचे आठ कोटींचे कर्ज मंजूर झाले आहे. मंजुरीचा रिपोर्ट ई-मेलवर पाठवतो. कर्ज मंजुरीचे पत्र पाठविल्यानंतर काही दिवसांनी संशयित दास याने प्रोसेसिंग फी म्हणून वेळोवेळी पैशांची मागणी केली.

१३ डिसेंबर २०१७ ते २ जुलै २०१८ या कालावधीत भोसले यांच्याकडून फायनान्स कंपनीने बॅँक खाते, एनईएफटी अशा प्रकारे २२ लाख ३७ हजार रुपये उकळले होते. हे मोठे रॅकेट असून आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी सांगितले.याच प्रकरणात पोलिसाने घेतली होती लाचफसवणूक प्रकरणातील आरोपीला दिल्लीतून पकडून आणण्यासाठी प्रवासखर्च म्हणून २५ हजार रुपयांची मागणी करून ती लक्ष्मीपुरी पद्मा चौकातील एजंट चहा विक्रेत्यातर्फे स्वीकारल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचा संशयित हवालदार अजिज रमजान शेख (रा. लाईन बझार, कसबा बावडा, कोल्हापूर) व एजंट दाऊद बाबालाल पाटणकर (रा. रविवार पेठ, कोल्हापूर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी फसवणूक प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर