वारणानगर : कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेटवर आधारित निदान पद्धती, रोगप्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक औषधप्रणाली या विषयावर तात्यासाहेब कोरे फार्मसीच्या शिक्षकांचे पुनरावलोकनपर लेख कार्बोहायड्रेडस पॉलिमर टेक्नोलॉजीज ॲण्ड ॲप्लिकेशन्स या प्रसिद्ध जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील पोपट कुंभार, डॉ. अरेहल्ली मंजाप्पा व प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबईच्या डॉ. वंदना पत्रावले, अंजली पंड्या यांनी योगदान दिले.
कोविड-१९ चे तत्काळ निदान करणाऱ्या नवीन, स्वस्त आणि विशेष करून ज्यांच्यांवर विषाणूच्या मुटेशनचा परिणाम होणार नाही अशा निदान पद्धतींचा शोध आणि विकास करणे, नवीन मान्यताप्राप्त प्रभावी लस विकसित करून, वेळेत उपलब्ध करणे; कोविड-१९ ह्या विषाणूचा नाश करणाऱ्या औषधांचा शोध लावणे ही काळाची गरज आहे. संशोधनासाठी शास्त्रज्ञांना एक वेगळा विचार देण्याचे काम या लेखातून लेखकांनी केले आहे.
या लेखाचा जगभरातील संशोधक सखोल अभ्यास करतील आणि त्यातून पुढे आलेले ज्ञान यातून कोविड-१९ च्या पराभवासाठी उपयुक्त रोगनिदान संच, प्रभावी औषो आणि लसी यांचा शोध लागेल. पर्यायाने कोविड-१९ विरोधातील लढाई आपण जिंकू अशी अपेक्षा आमदार डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केली. वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. ...........................................
फोटो ओळी- कोविड-१९ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेटवर आधारित निदान पद्धती विषयावर पुनरावलोकनपर लेख प्रकाशित केल्याबददल आमदार विनय कोरे यांनी कोरे फार्मसी कॉलेजचे पोपट कुंभार, डॉ. मंजाप्पा व प्राचार्य डाॅ. डिसोझा यांचा सत्कार केला.