शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
3
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
4
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
5
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
6
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
7
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
8
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
9
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
10
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
11
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
12
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
13
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
14
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
15
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
16
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
17
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
18
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
19
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
20
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल

शिवसेना खासदार संजय मंडलिक यांचे अस्सल सोनं आठवड्यात बेन्टेक्स कसे झाले?, जनतेतून विचारणा  

By विश्वास पाटील | Published: July 18, 2022 8:57 AM

लोकसभेला भाजपच्या उमेदवारीसाठी आधीच टाकला रुमाल.

विश्वास पाटीलकोल्हापूर : गेल्या रविवारी शासकीय विश्रामधाममध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत जे शिवसेनेला सोडून गेले ते बेंन्टेक्स होते व आता अस्सल सोनंच पक्षात राहिले आहे असे छातीठोकपणे सांगणारे खासदार संजय मंडलिक हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे मंडलिक यांचे अस्सल सोनं आठवड्यात बेन्टेक्स कशामुळे झाले अशी विचारणा आता लोक करु लागले आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे २०२४ च्या निवडणुकीचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांनी भाजपकडे आताच रुमाल टाकला आहे व त्यासाठीच शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.

धनंजय महाडिक हे राज्यसभेवर गेल्याने भाजपकडे उमेदवार नाही. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या मतांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा मंडलिक यांच्या विजयात मोठा वाटा होता आणि २०२४ लाही तोच फायदा होईल असे गणित मांडून त्यांनी ही हनुमान उडी घेतली. मंडलिक हे गेल्या निवडणुकीतही सक्षम उमेदवार या प्रतिमेपेक्षा महाडिक नकोत या लाटेवर स्वार होवून विजयी झाले. आताही त्यांना मोदी लाटेवर स्वार व्हायचे आहे. कोल्हापूरची जनता ही स्वत:ची लाट निर्माण करणारी आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत या जनतेने अशीच लाट निर्माण केली म्हणूनच काँग्रेसच्या चिन्हावर एक सामान्य महिला आमदार झाल्या. कोणत्याही लाटेवर स्वार होवून कोल्हापूरात विजय मिळवता येत नाही. कोल्हापूर हे शहर प्रवाहाच्या उलटे पोहणारे आहे. त्याच ओळखीचा या शहराला कायमच अभिमान वाटला आहे.

इतिहास फार लांबचा नाही. लोकसभेच्याच २०१४ च्या निवडणुकीत देशात आता नाही त्याच्या कितीतरी पट मोठी मोदी यांच्या करिष्म्याची लाट होती. तरीही कोल्हापूरने मंडलिक यांचाच पराभव करून राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना निवडून दिले. निवडून आल्यानंतर ते राष्ट्रवादी व काँग्रेसशीही प्रामाणिक राहिले नाहीत. त्याची चीड म्हणून लोकांनी अगोदर महाडिक यांचा पराभव केला व त्यामुळे मंडलिक यांचा विजय झाला. आता मंडलिकही पुन्हा त्याच वाटेने गेले. त्यांनी आमचं ठरलंय अशी टॅगलाईन घेऊन मैदानात उतरून विजयाची हवा निर्माण केलेल्या माजी सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांचीही फसवणूक केली आहे. कोल्हापूरचा माणूस राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आहे. तो सर्वांचे मोजमाप वेळ आली की बरोबर करतो. त्याने २००९ च्या निवडणूकीत थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेही असेच मोजमाप करून दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांना इर्षेने निवडून दिले होते हा इतिहास ताजा आहे.

शिवसेनेचे पहिले खासदार.. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाच्या काळात मंडलिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आधार देण्यासाठी मातोश्रीवर थांबून होते. पक्षाच्या या कसोटीच्या काळात शिवसेनेसोबतच आहात याबद्दल समाजांतूनही चांगल्या प्रतिक्रिया होत्या. कारण त्याच पक्षाने मंडलिक यांना एकदा सोडून दोनदा उमेदवारी दिली. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून आतापर्यंत १९९१ पासून गेल्या ३१ वर्षात शिवसेनेने सात उमेदवार दिले. परंतु ही जागा जिंकता आली नव्हती. ती मंडलिक यांच्या रुपाने पहिल्यांदा जिंकली. परंतु शिवसेनेच्या पहिल्या खासदाराने अडीच वर्षात पक्षाशी गद्दारी केली अशीच इतिहासात नोंद झाली.

नवा घरोबा याचसाठी... खासदार म्हणून लोकसभेत कर्तृत्व दाखवण्याची संधी होती, पक्षात मानाचे स्थान होते. परंतु मागच्या पाच वर्षातही मंडलिक यांनी पक्षासाठी काय केले व निवडून आल्यावरही या अडीच वर्षात काय केले हा संशोधनाचाच विषय आहे. कदाचित त्याचेच उत्तर द्यावे लागू नये म्हणून त्यांनी नवीन घरोबा केला असण्याचीही शक्यता जास्त आहे.

लोकसभा २०१९ चा निकाल.. संजय मंडलिक (शिवसेना) : ७,४९,०८५धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) : ४,७८,५१७मताधिक्क्य : २,७०,५६८संघर्षाचा इतिहास पण.... स्वाभिमानास ठेच पोहोचली म्हणून दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक हे २००९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत वयाच्या पंचाहत्तरीतही शड्डू ठोकून मैदानात उतरले. पक्षाला आव्हान दिले. त्यांनी जेव्हा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा एकही नेता त्यांच्यासोबत नव्हता. परंतु त्यांची आव्हान देण्याची जिगर सामान्य जनतेला आवडली व ते जिंकले. मंडलिक या आडनावाचा असा संघर्षाचा इतिहास असताना आपण लाटेसोबत वाहत गेलात याचाच धक्का अनेकांना बसला.