कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे शनिवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते २५० दिव्यांगांना कृत्रिम उपकरणांचे वितरण करण्यात आले. राजारामपुरीतील भारत हौसिंग सोसायटीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पिंड नेतृत्वाचा, प्रशासकाचा आहे. गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने लोकांच्या सेवाकार्यामध्ये कोणतीही कमतरता ठेवली नाही. भारतीय जनता पक्षाचे सामाजिक कार्य असेच सुरू राहणार आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनीलसिंह चव्हाण, अभिजित शिंदे, विश्वास जाधव, अक्षय निरोखेकर, दिलीप बोंद्रे, रघुनाथ पाटील, दिनेश पसरे, महादेव बिरंजे, दत्ता लोखंडे, नाजीम अत्तार, कालिदास बोरकर, बापू राणे, रंगनाथ शिवशरण, गौरव सातपुते, देवरथ लोंढे, योगेश साळोखे, सागर अथणे, विनय रंगलानी यांनी परिश्रम घेतले. अमोल पालोजी, विजय आगरवाल, संजय सावंत, चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, भाजप गटनेते अजित ठाणेकर, मंडल अध्यक्ष भरत काळे उपस्थित होते.भाजप महिला आघाडीतर्फे जय शिवराय गल्ली, लक्ष्मीपुरी येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वितरण करण्यात आले. गणेश लोकरे यांनी ७० हून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी केली. याप्रसंगी महिला आघाडी अध्यक्षा गायत्री राऊत, मंगला निपाणीकर, आसावरी जुगदार, सुजाता पाटील, विजयमाला जाधव, समृद्धी पाटील उपस्थित होत्या.कसाबविरोधातील साक्षीदाराची मोदींनी घेतली दखलपाटील म्हणाले, कसाबला फासावर लटकविण्यासाठी ज्या व्यक्तीने साक्ष दिली, ती व्यक्ती कल्याणमध्ये एका रस्त्यावर पडली आहे, अशी माहिती फोनद्वारे नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना दिली. नंतर त्या व्यक्तीची दर दोन तासांनी चौकशी केली. त्या व्यक्तीची घरची परिस्थिती लक्षात घेता, तिला आपदा कोषाच्या माध्यमातून १० लाख रुपयांची मदत त्यांनी केली. यातून मोदी यांचा सेवा हा पिंड प्रकर्षाने दिसून येतो.