पन्हाळा : पावनगडावर ज्या ठिकाणी तोफगोळे सापडले, त्या जागेची पहाणी आज पुरातत्व विभागाच्या प्रादेशीक उपसंचालक नंदिनी साहु यांनी केली. यावेळी त्यानी सापडलेले तोफगोळे ताब्यात घेतले. पुरातत्व विभागाच्या प्रादेशीक उपसंचालक नंदिनी साहु यांचा नियोजीत दौरा पन्हाळा पोस्ट कार्यालयाच्या बांधकाम परवानगीसाठी होता. यातच अचानक पावनगडावर तोफगोळे सापडलेल्या जागेची त्यांनी पहाणी केली. नव्याने या ठिकाणी कोणतीही खोदाई करु नये, अशा सूचना त्यांनी दिल्या. सध्या हा किल्ला वनविभागाच्या ताब्यात असल्याने पुरातत्व विभाग कांहिंही करु शकत नाही, असे त्या म्हणाल्या.लवकरच पुरातत्व विभागाकडे पावनगड किल्ला ताब्यात देण्याविषयीचा प्रस्ताव वनविभागाकडे दिला जाइल असे सांगीतले.
धर्मकोठी परिसरात उभारणार वस्तू संग्रहालय
ताब्यात मिळालेले तोफगोळे पन्हाळ्यातील धर्मकोठी मध्ये ठेवले असुन या ठिकाणी लवकरच वास्तुसंग्रहालय उभे करणार असुन पन्हाळा व परीसरात सापडलेल्या वस्तु या ठिकाणी सर्वांना पाहण्यास मिळणार असल्याची माहीती नंदिनी साहु यांनी दिली.