शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

अरुण डोंगळे भाजपच्या वाटेवर!

By admin | Published: January 24, 2017 11:13 PM

दोन दिवसांत निर्णय : चंद्रकांतदादांसोबत झाली बैठक

आमजाई व्हरवडे : ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुणकुमार डोंगळे भाजपच्या वाटेवर आहेत. याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर डोंगळे यांची बैठक होऊन चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसांत त्यांची पुन्हा बैठक होणार असून, भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे समजते.राधानगरी तालुक्यात ‘गोकुळ’च्या माध्यमातून डोंगळे यांचा मोठा गट सक्रिय आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक म्हणून डोंगळे यांच्याकडे पाहिले जाते. गोकुळच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून कार्यरत असले, तरी संपूर्ण राधानगरी व भुदरगड तालुक्यांत डोंगळे गटाची स्वतंत्र यंत्रणा सक्रिय आहे. डोंगळे यांच्या भाजप प्रवेशाने ‘भोगावती’च्या निवडणुकीत काँग्रेसला मोठी किंमत मोजावी लागणार हे निश्चित आहे.गेल्या चार दिवसांपूर्वीच ‘गोकुळ’चे संचालक रणजित पाटील यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर पाठोपाठ डोंगळे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याने महाडिक समर्थक भाजपच्या वाटेवर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. काँग्रेसमध्येच राहून जिल्हा काँग्रेसचे पी. एन. पाटील यांच्याबरोबर त्यांचे कधीच सूत जुळले नाही. डोंगळे यांच्या पाठोपाठ तालुक्यातील अनेक नेते हातात कमळ घेण्याच्या तयारीत आहेत. मी भाजपमध्ये येण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आग्रही आहेत. त्यासाठी बैठकही झाली. सोमवारी माझी व त्यांची भेट झाली असून, आगामी ‘भोगावती’ व जि. प.च्या निवडणुकीसंदर्भात सखोल चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक होणार असून, या बैठकीतच भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल.- अरुणकुमार डोंगळे