शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

Kolhapur: ए.एस. ट्रेडर्स फसवणुकीतील संचालक महिलेस अटक, पोलिस अधीक्षकांकडून तपासाचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:47 AM

गेल्या साडेसात महिन्यांत केवळ ४० कोटींपर्यंत फसवणुकीच्या तक्रारी पोलिसांत दाखल

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीच्या संचालक महिलेस आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि. २०) अटक केली. सुवर्णा श्रीरंग सरनाईक (वय ५७, रा. अंबाई टँक, रंकाळा, कोल्हापूर) असे अटकेतील महिलेचे नाव आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या गुन्ह्याच्या तपासाचा आढावा घेऊन तपास गतिमान करण्याच्या सूचना दिल्या.गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोव्हेंबर २०२२ मध्ये दाखल झाला. ए.एस. ट्रेडर्स कंपनीच्या २७ संचालकांपैकी केवळ एका संचालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. आता पुन्हा या गुन्ह्याचा तपास गतिमान झाला असून, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी दुपारी सुवर्णा सरनाईक या संचालक महिलेस रंकाळा परिसरातील अंबाई टँक येथील तिच्या राहत्या घरातून अटक केली.ही महिला सुरुवातीला या कंपनीत एजंट म्हणून काम करीत होती. त्यानंतर तिची संचालक म्हणून वर्णी लागली. शेकडो गुंतवणूकदारांना कंपनीत गुंतवणूक करण्यास तिने भाग पाडले होते. कंपनीच्या परदेश सहलींमध्येही तिचा सहभाग होता, अशी माहिती तपास अधिकारी निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी दिली.पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्याकडून ए.एस. ट्रेडर्स फसवणूक गुन्ह्याच्या तपासाचा आढावा घेतला. या गुन्ह्यातील जास्तीत जास्त संशयितांना तातडीने अटक करा, त्यांच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्या जप्त करा, कंपनीचा लाभ घेतलेल्या एजंटना आरोपी बनवा, अशा सूचना त्यांनी दिल्या.तक्रारी करण्याचे आवाहनगेल्या साडेसात महिन्यांत केवळ ४० कोटींपर्यंत फसवणुकीच्या तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आवश्यक कागदपत्रांसह त्यांच्या तक्रारी पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे नोंदवाव्यात, असे आवाहन उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी केले.जामिनाचा आदेश रद्दया गुन्ह्यातील २७ संशयितांपैकी विक्रम जोतिराम नाळे (रा. सांगरूळ, ता. करवीर) याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, फिर्यादी रोहित ओतारी यांनी संशयिताच्या जामिनावर आक्षेप घेऊन न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायालयाने नाळे याचा जामिनाचा आदेश रद्द केल्याची माहिती ए.एस. ट्रेडर्स विरोधी कृती समितीचे विश्वजित जाधव यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस