कोल्हापूर : निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत व विशेष अभियानामुळे जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील २० हजार ९६१ मतदारांची नोंद झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागातर्फे मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू असून, २२ जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीत नाव असलेल्या नागरिकांनाच लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येईल.यंदाचे वर्ष निवडणुकांचे असल्याने लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे पडघम आताच वाजू लागले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगानेही गेल्या वर्षभरापासून अचूक मतदार यादी तयार करण्यावर भर दिला आहे. त्याअंतर्गत सुरू असलेल्या मतदार पुनरिक्षण उपक्रमांतर्गत दुबार, छायाचित्र एकसमान, दोन मतदारसंघांत नाव असलेले, मयत अशा व्यक्तींची नावे वगळली जात आहेत. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार लोकसभेसाठीची अंतिम मतदार यादी ५ जानेवारीला प्रसिद्ध होणार होती. मात्र, त्याला आता मुदतवाढ मिळाली असून, २२ जानेवारीला ही यादी प्रसिद्ध होईल.
जिल्ह्यातील एकूण मतदार
- पुरुष : १६ लाख ०४ हजार ३७९
- स्त्री : १५ लाख ४२ हजार ४४३
- तृतीयपंथी : १७१
कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदार?विधानसभा : पुरुष : स्त्री : तृतीयपंथी : एकूणचंदगड : १, ५८, ८४३ : १, ५७, ०३६ : ११ : ३, १५, ८९०राधानगरी : १, ७२, ०९४ : १, ५९, ९७३ : १४ : ३, ३२, ०८१कागल : १, ६४, २९० : १, ६२, १४९ : ३ : ३, २६, ४४२कोल्हापूर दक्षिण : १, ७३, ९८४ : १, ६७, ०७१ : ४४ : ३, ४१, ०९९करवीर : १, ६१, ४७५ : १, ४८, ०३८ : ० : ३, ९, ५१३कोल्हापूर उत्तर : १, ४३, ४५९ : १, ४५, २२९ : १७ : २, ८८, ७०५शाहूवाडी : १, ५१, ३३३ : १, ४१, १६८ : १७ : ३, २८, ७३७इचलकरंजी : १, ५३, ४४३ : १, ४५, ५०० : ६१ : २, ९९, ००४शिरोळ : १, ५६, ९०५ : १, ५६, ११२ : १ : ३, १३, ०१८एकूण : १६, ०४, ३७९ : १५, ४२, ४४३ : १७१ : ३१, ४६, ९९३