शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

कोल्हापूर जिल्ह्यातील 'इतक्या' शेतकऱ्यांना मिळाले ‘प्रोत्साहन’चे ४० कोटी, वर्षात दोन वेळा उचल केलेले खातेदार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 12:02 PM

निकष शिथील करुन दिला लाभ

कोल्हापूर : एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्जाची उचल केलेल्या पात्र १० हजार ७७९ शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल ४० कोटी १५ लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान शुक्रवारी जमा झाले. राज्य शासनाने निकषात बदल केल्याने हे खातेदार पात्र झाले होते.राज्य शासनाने २०१९ मध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली होती. या योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. त्यानंतर पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णयही त्यावेळी घेण्यात आला. पीककर्जाची परतफेड केलेल्या २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० यांपैकी कोणत्याही दोन वर्षांत नियमित परतफेड केलेले शेतकरी पात्र ठरले. या तीन वर्षांपैकी २०१९-२० मध्ये उचल केलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला.गेली पाच वर्षे प्रोत्साहन अनुदानाचे घोंगडे भिजत आहे. सहा महिन्यांपूर्वी बहुतांश शेतकऱ्यांना पैसे मिळाले; पण, कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी आहेत. ऊस उत्पादकांचा परतफेडीचा कालावधी आर्थिक वर्षात होत नाही. जूनपर्यंत परतफेड होत असल्याने एकाच आर्थिक वर्षात पीककर्जाची दोन वेळा उचल केलेली दिसते. या तांत्रिक मुद्द्यामुळे सुमारे ११ हजार ६६७ शेतकरी अपात्र ठरले होते. याविरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. यातील बहुतांश शेतकरी हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित आहेत. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष प्रयत्न करून या शेतकऱ्यांना पात्र ठरवले. प्रोत्साहन अनुदानाच्या निकषात बदल करून सुधारित अध्यादेश काढल्यानंतर विकास संस्थांकडून शेतकऱ्यांची नावे मागवली.

त्यानुसार जिल्ह्यातून ११ हजार ६६७ खातेदार शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी पाठवण्यात आली. निकषांनुसार त्यातील १० हजार ७७९ शेतकरी पात्र ठरले. मात्र, गेली दीड-पावणे दोन महिने त्यांचे पैसेच आले नव्हते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. अखेर, शुक्रवारी या शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल ४० कोटी १५ लाख रुपये जमा झाले.अपात्र ३३ हजार शेतकऱ्यांचे काय?एकच वर्ष परतफेड केलेले, आयकर परतावा करणारे, कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेले ३३ हजार ६६७ शेतकऱ्यांना अपात्र ठरवले आहे. बँक व सहकार विभागाने योग्य प्रकारे माहिती न भरल्याने शेतकरी अपात्र ठरल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

दृष्टिक्षेपात प्रोत्साहन अनुदान योजनाअर्ज दाखल केलेले खातेदार : ३,००,८८५आतापर्यंत लाभ मिळालेले : १,८८,५६९एकूण रक्कम : ६८६ कोटी ५१ लाख.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीbankबँक