शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
4
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
6
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
7
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
8
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
9
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
10
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
11
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
12
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
13
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
14
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
15
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
16
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
17
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
18
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
19
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
20
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज

LokSabha2024: कोल्हापुरात किरकोळ वाद, तणाव वगळता शांततेत मतदान; पोलिसांनी सोडला नि:श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 1:15 PM

अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात अत्यंत चुरशीने झालेल्या मतदानादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद आणि घोषणाबाजीचे प्रसंग घडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. राज्य गुप्तवार्ता विभागाचे अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी काही ठिकाणी भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. दरम्यान, सलग बंदोबस्तांमुळे त्रासलेल्या पोलिसांनी मतदान संपताच नि:श्वास सोडला.मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात एक पोलिस अधीक्षक, दोन अपर पोलिस अधीक्षक, सहा उपअधीक्षक, २१ पोलिस निरीक्षक, १९४ सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्यासह ४७३५ पोलिस कॉन्स्टेबल, ३ हजार होमगार्ड, केंद्रीय राखीव दलाच्या तीन तुकड्या, राज्य राखीव पोलिस दलाच्या पाच तुकड्यांनी परिश्रम घेतले. राज्य गुप्तवार्ता विभागाचे अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी शहरातील सदर बाजार, कदमवाडी, भोसलेवाडी यासह वडणगे (ता. करवीर) येथील काही मतदान केंद्रांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनीही शहरासह जिल्ह्यातील मतदार केंद्रांची पाहणी करून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना केंद्रापासून १०० मीटरच्या बाहेर थांबण्याच्या सूचना दिल्या.लाइन बाजार येथे महासैनिक दरबार ट्रेनिंग सेंटरबाहेर शिवसेना आणि काँग्रेसचे बूथ जवळच होते. घोषणा देण्याच्या कारणावरून दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला. सदर बाजार येथे मतदान प्रक्रिया संपल्यानंतर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. याच ठिकाणी उशिरा आलेल्या काही मतदारांना मतदान करता आले नाही. यावरूनही मतदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वाद झाला. अखेर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.

गोपनीयतेचा भंगमतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास परवानगी नसतानाही काही मतदारांनी कर्मचारी आणि पोलिसांची नजर चुकवून मोबाइलवर मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करून गोपनीयतेचा भंग केला. काही जणांनी तर व्हॉट्सॲप स्टेटसला व्हिडीओ लावून आपले मत जाहीर केले. याबाबत संबंधितांना नोटिसा पाठवणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४VotingमतदानPoliceपोलिस