शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

ए.एस.ट्रेडर्सने गुन्हे दाखल झाल्यानंतरही नव्या कंपन्यांत वळविले पैसे, ५५ बँक खाती गोठवली, दोन कार जप्त

By उद्धव गोडसे | Published: May 06, 2023 12:26 PM

संचालकांची पार्श्वभूमी फसवेगिरीची,  मालमत्ता जप्तीची प्रक्रिया गतिमान

उद्धव गोडसेकोल्हापूर : ए.एस. ट्रेडर्सच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतरही कंपनीच्या संचालकांनी फसवणूक करणे थांबवले नाही. जानेवारी २०२३ मध्ये नवीन दोन कंपन्या सुरू करून त्याद्वारे गुंतवणूक जमा केली. तसेच कोट्यवधींची रक्कम नवीन कंपन्यांच्या खात्यांमध्ये वळवल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. पोलिसांनी कंपन्यांसह संचालकांची ५५ बँक खाती गोठवली आहेत, तर दोन आलिशान कार जप्त केल्या.नोव्हेंबर २०२२ मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनी बंद होणार नाही. परतावे थांबणार नाहीत, उलट गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याचे ठासून सांगितले जात होते. त्यासाठी वारंवार ऑनलाइन झूम मिटिंग, सेमिनार्स घेतले जात होते. मात्र, भविष्यातील धोके ओळखून संचालक नवीन चाल खेळले. त्यांनी पैसे वळविण्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये नवीन दोन कंपन्या सुरू केल्या. त्या कंपन्यांच्या खात्यांवर मोठ्या रकमा वळविल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. नवीन दोन कंपन्यांसह जुन्या सर्व कंपन्या आणि संचालकांची एकूण ५५ बँक खाती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोठवली.ए.एस. ट्रेडर्सच्या संचालकांनी गेल्या ४-५ वर्षांत मिळवलेले कोट्यवधी रुपये आलिशान बंगले, महागड्या गाड्या, दागिने, प्लॉट, जमिनी खरेदीत गुंतवले. ती सर्व गुंतवणूक पोलिसांच्या रडारवर आली असून, जप्तीच्या कारवाया सुरू झाल्या आहेत. संशयित संचालक आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नावावरील वाहनांची माहिती आरटीओ विभागाकडून मागविण्यात आली.महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते तलाठ्यांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांकडून संशयितांनी केलेल्या जमीन खरेदीची माहिती मागवली आहे. त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. गुंतवणूकदारांच्या पैशातून खरेदी केलेली सर्व मालमत्ता जप्त केली जाणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

महागड्या कार...श्रीमंती दाखवण्यासाठी ए.एस.च्या संचालकांनी जग्वार, मर्सिडीज, ऑडी, फोर्च्युनर अशा महागड्या कार वापरल्या. खासगी सुरक्षारक्षक घेऊन ते वावरत होते. काही संचालक आणि एजंटनी वाढदिवस, लग्न समारंभासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला. करवीर तालुक्यातील काही भपकेबाज वाढदिवसांच्या सुरस कथा आजही सांगितल्या जातात. सर्व संचालकांच्या महागड्या कार आणि एजंटना दिलेल्याही कार पोलिसांकडून जप्त केल्या जाणार आहेत.

संचालकांचा इतिहास फसवणुकीचाच

ए.एस.च्या अनेक संचालकांचा इतिहास फसवणुकीचा आहे. यापूर्वी साखळी पद्धतीच्या मार्केटिंग स्कीममधून त्यांनी अनेकांना गंडा घातला. काहींनी शेअर मार्केटिंगच्या निमित्ताने लोकांकडून पैसे घेतले. फसवणुकीचा अनुभव पाठीशी असल्यानेच त्यांनी पुन्हा मोठा गंडा घालण्याचे धाडस केल्याचे बोलले जात आहे.

सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या पैशांवर मौजमजा करणाऱ्या संचालकांभोवती कारवाईचा फास आवळला आहे. त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे काम सुरू आहे. गुंतवणूकदारांनी निर्भयपणे तक्रारी द्याव्यात. - औदुंबर पाटील - तपास अधिकारी, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी