शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

आसावरी भालेराव, स्वप्नांकित बडेची बाजी

By admin | Published: June 05, 2015 1:02 AM

बारावी परीक्षेतील यश : सर्वाधिक गुण मिळविले; प्रथम वर्षाचे प्रवेश आजपासून

कोल्हापूर : करिअरची दिशा ठरविणाऱ्या बारावीच्या परीक्षेत अभ्यासातील सातत्याच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनींनी यश मिळविले आहे. त्यात कोल्हापूर विभागात मराठी विषयात राजाराम महाविद्यालयातील आसावरी भालेराव हिने १०० पैकी ९६ गुण मिळविले आहेत. भौतिकशास्त्रात न्यू कॉलेजच्या स्वप्नांकित बडे, इचलकरंजीतील नेहा मुथा, सतीश म्हेत्रेने शंभर गुण, तर इंग्रजीमध्ये इचलकरंजीतील सोनाली रणधर हिने १०० पैकी ९५ गुणांची कमाई करत बाजी मारली.बारावीच्या गुणपत्रिकांचे महाविद्यालयांमध्ये गुरुवारी दुपारी विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांची नावे महाविद्यालयांनी जाहीर केली. कोल्हापूर विभागामध्ये जीवशास्त्र विषयात जयसिंगपूरमधील जनतारा कल्पवृक्ष ज्युनिअर कॉलेजच्या विलास लडगेने १०० पैकी ९९ गुण मिळविले. भौतिकशास्त्रात विवेकानंदच्या काजल राऊत हिने शंभर गुण मिळविले. विषयनिहाय सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेल्या निकालाच्या सारांश पुस्तिकेमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, कोल्हापुरातील तात्यासाहेब तेंडुलकर ज्युनिअर कॉलेजमधील वाणिज्य शाखेचा निकाल ९८ टक्के, कला शाखेचा ९० टक्के, बँकिंग शाखेचा ९१. ३० आणि कुकरी शाखेचा ८८.८८ टक्के निकाल लागला. त्यात सायली मोहिते (७६.४६ टक्के, वाणिज्य), वैशाली शिंदे (७२ , कला), शिवानी कटारे (७९.५३, बँकिग),आल्फिया शिकलगार हिने (६६.७८, कुकरी) प्रथम क्रमांक पटकाविला. वडणगे (ता. करवीर) येथील देवी पार्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलचा निकाल ८७.८० टक्के लागला. त्यात पल्लवी भोईने (८२.१५) प्रथम, भाग्यश्री पवारने (७९.३८) द्वितीय आणि पूजा सुतारने (७७.५३) तृतीय क्रमांक मिळविला. केएमसी कॉलेजचा वाणिज्य शाखेचा निकाल ७८.४१ टक्के लागला. त्यात रुपाली जाधवने (७६.६२) प्रथम, तृप्ती फोडकेने (७६.४६) द्वितीय आणि ज्ञानेश्वर सुतारने (७२.१५) तृतीय क्रमांक मिळविला. महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९६.२५ टक्के लागला. त्यात धनश्री पाटील (८०.७७, विज्ञान), रचना राऊत (७९.८५, वाणिज्य), अनघा म्हेतर (८१.८, कला), अतिश कसबेकरने (७४.७७, एमसीव्हीसी) प्रथम क्रमांक पटकाविला. शहाजी महाविद्यालयाचा निकाल ८६.१० टक्के निकाल लागला.सांगली, साताऱ्यातील गुणवंत...कोल्हापूर विभागात पलूस (जि. सांगली) एल. के. कॉलेजमधील अभिषेक देसाईने इंग्रजी विषयात ९५ आणि रसायनशास्त्रात १०० गुण मिळविले. कुंडलच्या तेजश्री पाटील हिने इंग्रजीत ९५ गुण प्राप्त केले. जतच्या के. एम. हायस्कूलच्या राजश्री मिल्गनावर हिने अर्थशास्त्रात ९५ गुणांसह बाजी मारली. साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या सौरभ कुलकर्णी इंग्रजीत ९५ गुणांसह, फलटणमधील मुधोजी ज्युनिअर कॉलेजच्या चैताली रासकर भौतिकशास्त्रात शंभर गुणांसह अव्वल ठरली.