लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : स्वर्गीय डी. डी. आसगावकर यांचे संपूर्ण जीवनच संघर्षमय होते, त्यातून त्यांनी घेतलेली भरारी आजच्या शिक्षकांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले.
गुरुवर्य डी. डी. आसगावकर ट्रस्टच्या वतीने शनिवारी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, डी. डी. आसगावकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने माणसं कमावली. त्यांच्या पावलावर पाऊल आमदार जयंत आसगावकर यांनी ठेवले आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी यापुढे अधिक जोमाने काम करून भावी पिढी यशस्वी बनवावी.
पुरस्कारामागील हेतू विशद करत सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव आमदार प्रा. जयंत आसगावकर म्हणाले, पारदर्शकपणे पुरस्कारासाठी निवड केली जात असल्याने दिवसेंदिवस पुरस्काराचा दर्जा वाढत असून, आगामी काळात शिक्षण क्षेत्रातील रत्ने शोधून त्यांना बळ देण्याचे काम केले जाईल. ना. बा. एज्युकेशन सोसायटी, इचलकरंजीसह प्राचार्य राजेंद्र लोखंडे, सीमा सांगरूळकर, चुडाप्पा कुमार, स्वाती पंडित, बाबूराव पाटील, सागर वातकर, सुधीर कांबळे, गीता मुरकुटे, बाबासाहेब कुंभार, शिवानंद घस्ती, अमित शिंत्रे, विलास आरेकर, अभिजित गायकवाड, अनिलकुमार गुरव, मच्छिंद्र कुंभार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सागर वातकर, सीमा सांगरूळकर, गीता मुरकुटे, संपतराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, शिक्षक नेते दादासाहेब लाड, वसंतराव देशमुख, बाबा पाटील, खंडेराव जगदाळे, एस. डी. लाड, सुरेश संकपाळ, संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे, के. ना. जाधव, डी. जी. खाडे, इंदूमती आसगावकर, प्रमोद आसगावकर, आदी उपस्थित होते.
(फोटो ओळी स्वतंत्र देतो.)