आषाढी वारी यात्रा २० जुलै रोजी होत असून कोरोनाच्या संकटामुळे पंढरपूर येथील आषाढी वारीवर निर्बंध घातले असून, प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या नंदवाळ येथेही कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावमधून भाविक मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होतात; परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कोल्हापूर जिल्ह्याला सतावत असून, वारकरी भाविक या वारीला हजेरी लावतात. एवढ्या मोठ्या संख्येने भाविक एकत्रित जमले तर कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावू शकतो आणि वारीला येणाऱ्या भाविकांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो, ही शक्यता गृहीत धरून येणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांना नंदवाळमध्ये यात्राकाळात बंदी घालण्यात आली आहे.
कोट...
कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असून भाविकांचे सोशल डिस्टन्सिंग व अन्य सुविधा देण्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडून शक्य होणार नसल्याने दक्षता समिती व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने यात्रा रद्द करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार करवीरचे तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांनी यात्रा रद्द करण्याचा आदेश काढला आहे.
अस्मिता कांबळे
सरपंच, ग्रामपंचायत