बांबवडे: साळवी (ता. शाहूवाडी) येथील आशिष अशोक पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या २०२३ च्या परीक्षेत १४७ साव्या रँकने आयएएस प्राप्त करून सलग तिसऱ्या वर्षी यशाला गवसणी घातली. ते सध्या दिल्ली ,दिव- दमन या केंद्रशासित प्रदेशात उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते.केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत २०२३ साली घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यामध्ये आशिष यांची १४७ रँकने आयएएस पदी निवड झाली. यापूर्वी त्यांनी २०२२ मध्ये ४६३ तर २०२१ मध्ये ५६३ व्या रँक ने यशाला गवसणी घातली होती. आता ऑल इंडिया मध्ये १४७ रँक त्यांनी प्राप्त केली. आशिषचे वडील प्राथमिक शिक्षक असून आई गृहिणी आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण पिरवाडी येथे झाले. चौथी स्कॉलरशिप ला त्यांनी राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला होता. पाचवी ते सातवी सुपात्रे येते तर आठवी ते दहावीचे शिक्षण बांबवडे येथे पूर्ण केले. दहावीमध्ये त्यांनी ९७% गुण प्राप्त केले होते. पुढे अकरा बारावी पुणे येथे करून बीटेक पदवी प्राप्त केली व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तेथे सुरू केला.दिल्ली दिव- दमन या केंद्रशासित प्रदेशात उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी आयएएस अभ्यासक्रमाची तयारी चालूच ठेवली होती व त्यांनी व या यशाला गवसणी घातली. २०२१ ते २३ या सलग तीन वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये त्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. याबद्दल तालुक्यातून आशिष चे अभिनंदन होत आहे.
लहानपणापासूनच आशिषला अभ्यासाची आवड होती. यातून त्याला स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. स्कॉलरशिप पासून ते आयपीएस पर्यंत त्यांने कधी मागे वळून पाहिले नाही. म्हणून त्याला हे यश प्राप्त होत गेले. याचा आम्हा कुटुंबियांना सार्थ अभिमान वाटतो. - अशोक पाटील, वडील