यावेळी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने प्रमुख उपस्थित होते.
कॉलेजने परिसरात स्वछता निर्माण केली. ओला, सुका कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची उत्तम सोय निर्माण केली. स्वच्छ शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. बाह्य व अंतर्गत स्वछता ठेवून नीटनेटकेपणा ठेवला. या सर्वांची दखल घेत परीक्षण करून नगरपालिकेने माने फार्मसी कॉलेजला प्रथम क्रमांक दिला, अशी माहिती प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांनी दिली.
फार्मसी कॉलेजने विविध उपक्रम सतत राबवून सामाजिक जबाबदारी पार पाडण्यात नेहमीच अग्रेसर राहण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांच्या आरोग्यविषयक काळजीसंदर्भात प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करून उत्तम कर्तव्य बजावत आहे. कॉलेजचे काम कौतुकास्पद आहे, असे मत यावेळी मुख्याधिकारी यांनी व्यक्त केले.
फोटो ओळी-स्वच्छ महाविद्यालयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस अशोकराव माने फार्मसी कॉलेजला मुख्याधिकारी सुषमा शिंदे (कोल्हे) यांच्या हस्ते संस्था अध्यक्ष विजयसिंह माने यांना देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, मनीषा माने, डॉ. एस. एस. पाटील उपस्थित होते.