जयसिंगपूर : कोल्हापूर ते सांगली महामार्गापासून तमदलगेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. हा रस्ता आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विकासनिधीतून मंजूर झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या मार्गाची मोठी दुरावस्था झाली होती. हा रस्ता गावाकडे जाणासाठी मुख्य मार्ग असल्याने या मार्गावरून दुचाकीसह मोठी वाहतूक होत असते. ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता’ अशी अवस्था या रस्त्याची बनली होती. त्यामुळे या रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी वारंवार होत होती. या मागणीची दखल घेऊन मंत्री यड्रावकर यांनी रस्त्याच्या डांबरीकरणाला निधी देऊन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांसह वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. डांबरीकरणाचे काम सुरू करतेवेळी पिरगोंडा पाटील, सरपंच धनाजी नंदीवाले, दिग्विजय सूर्यवंशी, पुरुषोत्तम शिरसेट, सुजित पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.