शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

सहायक आयुक्तांना ‘स्थायी’तून बाहेर काढले

By admin | Published: October 08, 2016 1:01 AM

प्रकाश गवंडी यांच्यावरील गुन्ह्याचे पडसाद : गुन्हा दाखल केल्याप्रकरणी खाडे यांना सदस्यांनी विचारला जाब

कोल्हापूर : नगरसेविका माधवी गवंडी यांचे पती प्रकाश गवंडी यांच्या विरोधात प्रशासनाकडून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या प्रकाराचे पडसाद शुक्रवारी महानगरपालिका स्थायी समिती सभेत उमटले. गवंडींच्या विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या सहायक आयुक्त सचिन खाडे यांना सभा सुरू झाल्यानंतर सभागृहातून बाहेर काढण्यात आले. तसेच त्यांचा निषेध करून ही सभा तहकूब करण्यात आली. यावेळी गुन्हा दाखल का केला, म्हणून खाडे यांना सर्वच सदस्यांनी जाब विचारला. गुरुवारी रात्री सहायक आयुक्त सचिन खाडे यांनी नगरसेविका माधवी गवंडी यांचे पती प्रकाश गवंडी यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रभाग समितीच्या सभेत आपणास कोंडून ठेवले, धमकी दिली, असा आरोप खाडे यांनी केला होता. त्याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी स्थायी समिती सभेत उमटले. कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी सत्यजित कदम यांनी खाडे-गवंडी वादाविषयी विचारणा केली; पण आधी विषयपत्रिकेवरील विषय संपवू आणि मग त्या विषयावर चर्चा करू, अशी विनंती सभापती मुरलीधर जाधव यांनी केली. त्यामुळे विषयपत्रिकेवरील चर्चा झाल्यानंतर खाडे-गवंडी वादावर चर्चा सुरू झाली. सभापती जाधव, सत्यजित कदम, सूरमंजिरी लाटकर, नीलेश देसाई, जयश्री चव्हाण, दीपा मगदूम यांच्यासह सर्वच सदस्यांनी सहायक आयुक्त खाडे यांना घेरले. काल काय झाले याची माहिती द्या, असे त्यांना सुनावले. खाडे काही सांगण्याचा प्रयत्न करत असतानाच कदम, लाटकर यांनी त्यांनाच दमात घेतले. तुम्ही थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापूर्वी महापौर, स्थायी समिती सभापती, गटनेते, प्रभाग समिती सभापती यांच्या कानावर ही गोष्ट का घातली नाही, अशी विचारणा करण्यात आली. कोणाचा दबाव होता का? तुम्हाला रक्तदाब, हायपर टेन्शनचा त्रास आहे का, अशी विचारणाही नगरसेवकांनी त्यांना केली.प्रश्नांच्या सरबत्तीने सहायक आयुक्त खाडे भेदरले. त्यांना काहीही सुचत नव्हते. सभापती जाधव यांनी खाडे यांचा निषेध करत असल्याचे सांगून त्यांना सभागृहातून बाहेर जाण्याचा आदेश दिला. त्यामुळे खाडे निमूटपणे सभागृहातून बाहेर गेले. त्यानंतर सभागृहात खाडे यांच्या वर्तणुकीचा निषेध करून सभेचे कामकाज तहकूब केले. या प्रकारामुळे सर्वच अधिकारी मात्र हबकून गेले. (प्रतिनिधी)दमबाजी होत असताना बघत बसू काय? : आयुक्त नगरसेवक तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून अधिकाऱ्यांना जर दमबाजी होत असेल आणि महापालिकेच्या कामकाजात त्यांचा सातत्याने हस्तक्षेप होत असेल तर आयुक्त म्हणून नुसते बघत बसायचे काय? असा शब्दांत आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांच्याविरोधात करण्यात आलेल्या फौजदारी कारवाईचे समर्थन केले. गेल्या वर्षभरात कामकाजातील हस्तक्षेपाचे अनेक प्रकार घडले. अधिकाऱ्यांना दमबाजी झाली. मारहाण, शिवीगाळीचे प्रकार घडले. कर्मचारी असो की अधिकारी; यांच्याबाबत घडणाऱ्या घटना योग्य नाहीत. याला कोठेतरी पायबंद बसला पाहिजे होता; म्हणून शुक्रवारी फौजदारी करण्याचे आदेश दिले, असे शिवशंकर यांनी सांगितले. यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून अनेकांनी विनंती केली. स्थानिक अधिकारी तक्रार द्यायला घाबरतात म्हणून यापूर्वी मला काही करता आले नाही. सहायक आयुक्त हा सरकारी अधिकारी आहे. त्यालाच जर दमबाजी होत असेल तर आयुक्त म्हणून मी काय बघत बसावे का? यापुढेही अशाच घटना घडत गेल्या तर कारवाई ही करावीच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. ४\३तीन नगरसेविकांसह सात अधिकाऱ्यांना नोटीस१ महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केट प्रभाग समिती सभेतील कामकाजात नातेवाइकांनी केलेल्या हस्तक्षेपाबाबत आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी तीन नगरसेविकांना नोटीस बजावली आहे; तर याच सभेस गैरहजर राहणाऱ्या सहा अधिकाऱ्यांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली आहे. त्यांना सात दिवसांची मुदत दिली असून, खुलासा आला नाही तर कारवाईचा इशारा दिला आहे. नगरसेविका माधवी गवंडी यांच्यासह सुनंदा मोहिते, अनुराधा खेडकर यांना ही नोटीस बजावली आहे. गवंडी, मोहिते व खेडकर यांचे पती गुरुवारी झालेल्या प्रभाग समिती सभेस उपस्थित राहून सभेच्या कामकाजात हस्तक्षेप करीत होते, असा आयुक्तांचा दावा आहे. महापालिकेच्या कामात नगरसेविकांच्या पतींना, अन्य नातेवाइकांना हस्तक्षेप करता येणार नाही, अशी सूचना आयुक्त शिवशंकर यांनी यापूर्वी नगरसेवकांना दिलेली आहे. तरीही सभेत हा हस्तक्षेप झाल्यामुळे कारवाईचे पाऊल उचलले. २ गुरुवारी (दि. ६) शिवाजी मार्केट प्रभाग समिती सभेत सहायक आयुक्त सचिन खाडे आणि माधवी गवंडी यांचे पती प्रकाश गवंडी यांच्यात झालेल्या बाचाबाचीमुळे आयुक्त शिवशंकर यांनी ही बाब अत्यंत गंभीरपणे घेतली आहे. नगरसेविकांच्या नातेवाइकांचा कामकाजातील वाढता हस्तक्षेप लक्षात घेऊन आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. गुरुवारच्या प्रभाग समिती सभेस गैरहजर राहिल्याप्रकरणी अभियंता रावसाहेब चव्हाण, पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता बी. जी. कुराडे, इस्टेट विभागाचे प्रमुख प्रमोद बराले, बागा खात्याचे सहायक अधीक्षक गणेश खाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अकौंटंट अशोक यादव, घरफाळा विभागाचे सहायक अधीक्षक तानाजी मोरे, विद्युत शाखेचे प्रमोद दळवी यांनाही आयुक्तांनी नोटीस बजावली. प्रभाग समितीच्या सभेस उपस्थित न राहिल्याने नोटीस बजावली.