कोल्हापूर : थंडीचा कडाका थांबण्याचे नाव घेत नसल्याने वयोवृद्ध, लहान मुलांना त्याचा त्रास होत आहे. अस्थमा, हृदयविकाराच्या रुग्णांना ही थंडी जीवघेणी ठरत असून ते हैराण झाले आहेत. वातावरणातील बदलाने अशा प्रकारचे रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. आणखी दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याचा पारा १० डिग्रीपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.संपूर्ण देशभर थंडीची लाट पसरली आहे. उत्तरेकडून थंडीची लाट दक्षिणकडे सरकली आहे. अंगाला बोचणारे वारे रक्त गोठवत आहे. पश्चिम महाराष्टÑाच्या तुलनेत विदर्भ, मराठवाडा व खानदेशात थंडीचे प्रमाण जास्त आहे. पश्चिम महाराष्टÑाचा पाराही घसरला असून, कोल्हापूरचे किमान तापमान १० डिग्रीपर्यंत खाली आले आहे. रोज तापमानात घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढतच आहे.थंडीचा सर्वाधिक त्रास वयोवृद्ध रुग्ण व लहान मुलांना होत आहे. विशेषत: अस्थमा, हृदयविकाराच्या रुग्णांना थंडी जीवघेणीठरत आहे. रक्त गोठवणाऱ्या थंडीने शरीरातील रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यातूनच पॅरालिसिसचे शक्यता अधिक असते. थंडीने न्यूमोनिया, सर्दी, खोकला,त्वचारोग, टॉन्सिल सुजणे आदीत्रास सुरू होतात. आणखीदोन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे.थंडीपासून बचाव करण्यासाठी हे करावेरात्री झोपताना अंगात व पांघरण्यासाठी ऊबदार कपडे वापरावीत.सकाळी लवकर थंडीत बाहेर पडू नये.गरम पेय, जेवण घ्यावे.रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने दिनक्रम ठरवावा.तुलनात्मक कोल्हापुरातील तापमान, डिग्रीमध्येकिमान कमालदिनांक २०१७ २०१८ २०१७३१ डिसेंबर २०१७ १७ १० ३२ २९ (२०१८)१ जानेवारी २०१८ १७ १० ३१ २९ (२०१९)२ जानेवारी २०१८ १७ १० ३० ३० (२०१९)३ जानेवारी २०१८ १६ १२ ३० ३० (२०१९)
अस्थमा, हृदयविकारांचे रुग्ण थंडीमुळे हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 12:50 AM