शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

Supermoon Kolhapur : खगोलप्रेमींनी अनुभवला सुपरमून, छायाकल्प चंद्रग्रहणाची सोळा मिनिटांची प्रचीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 8:33 PM

Supermoon Kolhapur : या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण जगभरात आज, बुधवारी दिसले, पण कोल्हापुरकरांनी मात्र, हे चंद्रग्रहण पीनम्ब्रल म्हणजेच छायाकल्प चंद्रग्रहण स्वरुपात अनुभवले. मोठा आणि अधिक तेजस्वी असलेल्या या वर्षअखेरीचा अखेरचा सुपरमून होता. कोल्हापूरकरांनी हा चंद्रग्रहणाचा कालावधी तब्बल सोळा मिनिटे अनुभवता आला. या वेळेला पृथ्वीच्या सावलीचा काही भाग चंद्रावर पडला होता.

ठळक मुद्देखगोलप्रेमींनी अनुभवला सुपरमूनछायाकल्प चंद्रग्रहणाची सोळा मिनिटांची प्रचीती

कोल्हापूर : या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण जगभरात आज, बुधवारी दिसले, पण कोल्हापुरकरांनी मात्र, हे चंद्रग्रहण पीनम्ब्रल म्हणजेच छायाकल्प चंद्रग्रहण स्वरुपात अनुभवले. मोठा आणि अधिक तेजस्वी असलेल्या या वर्षअखेरीचा अखेरचा सुपरमून होता. कोल्हापूरकरांनी हा चंद्रग्रहणाचा कालावधी तब्बल सोळा मिनिटे अनुभवता आला. या वेळेला पृथ्वीच्या सावलीचा काही भाग चंद्रावर पडला होता.चंद्रग्रहणास आज, बुधवारी दि. २६ मेच्या रात्री ७ वाजून ५ मिनिटांनी सुरुवात झाली आणि रात्री ७ वाजून १९ मिनिटापर्यंत हे छायाकल्प चंद्रग्रहण दिसले. छायाकल्प चंद्रग्रहणाचा वेळी चंद्र बिंबाची तेजस्विता उणे ०. ७१२ एवढी होती. हे चंद्रदर्शन म्हणजे या वर्षातील अखेरचं सुपरमून होते. चंद्र हा पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ८४ हजार किलोमीटरवर आहे. आज, तो ३ लाख ५७ हजार किलोमीटरवर होता, त्यामुळे तो मोठा आणि जास्त तेजस्वी दिसला.कोल्हापूरातील खगोलप्रेमींनी अनुभवली पर्वणीकोल्हापूरातील खगोलप्रेमींनी ही पर्वणी साधली. कोल्हापूरातील कुतूहल फौंडेशनचे आनंद आगळगांवकर, सागर बकरे, उत्तम खारकांडे, राजेंद्र भस्मे, शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर, सनी गुरव, विवेकानंद महाविद्यालयाचे पदार्थ विज्ञान व खगोलशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह ग्रामीण भागातून सोळांकूर येथील सायन्स कॉलेजचे प्राध्यापक अविराज जत्राटकर, किरण गवळी आदींसह अनेक खगोलप्रेमींनी आपापल्या ठिकाणांहून हा खगोलक्षण अनुभवला.तेजस्वी चंद्रामुळे उघड्या डोळ्यांनी पाहिले ग्रहणचंद्रग्रहण हे चंद्र, पृथ्वी आणि सूर्य सरळ रेषेत आल्यावर होत असते ज्यामध्ये पृथ्वीची सावली हि चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण आपणास दिसू लागते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला, तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला, तर छायाकल्प चंद्रग्रहण दिसते. तर छायाकल्प ग्रहणात पृथ्वीची पडछाया चंद्रावर पडल्यामुळे चंद्र पूर्णतः झाकला गेला नाही. तो पृथ्वीच्या उपछायातुन मार्गस्थ झाल्याने या चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला होता. पौर्णिमेच्या चंद्राची ग्रहकालावधीत तेजस्विता उणे ०. ७१२ असल्यामुळे हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता आले. 

टॅग्स :Supermoonसुपरमूनkolhapurकोल्हापूर