शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

Jyotiba Temple: पाडव्याच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगरावर पहिली मानाची सासनकाठी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 3:44 PM

आज मंदिरात श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली. ही महापूजा वर्षातून एकदाच बांधण्यात येते. दहा गावकऱ्यांनी ही महापूजा बांधली.

जोतिबा : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आज जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या तसेच जोतिबा परिसरातील सासनकाठ्या पारंपरिक पद्धतीने सजवून दिमाखात उभ्या केल्या. दरम्यान, आज मंदिरात श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली. ही महापूजा वर्षातून एकदाच बांधण्यात येते. दहा गावकऱ्यांनी ही महापूजा बांधली.तर, सकाळी अकरा वाजता निगवे दुमाला (ता. करवीर) येथील हिम्मतबहाद्दूर चव्हाण यांची मानाची सासनकाठी सवाद्य मिरवणुकीने डोंगरावर दाखल झाली. मुख्य मंदिर परिसरात आल्यावर ही सासनकाठी ग्रामस्थ व भाविकांनी नाचविली. या वेळी संग्रामसिंह चव्हाण, रणजितसिंह चव्हाण, रणवीरसिंह चव्हाण, नुतन लोकनियुक्त सरपंच राधा बुणे, देवस्थान समितीचे अधिक्षक दिपक म्हेत्तर ग्रामस्थ, पुजारी उपस्थित होते.मानाची सासनकाठी मंदिर परिसरात आल्यावर गुलाल-खोबऱ्याची उधळण झाली. "जोतिबाच्या नावानं चांगभलं‘चा जयघोष करत भाविकांनी मंदिराभोवती प्रदक्षिणा काढल्या. त्यानंतर सासनकाठी सदरेजवळ उभी केली. दुपारी १२ वाजता तोफेची सलामीने नवीन पंचागाचे विधीवत श्रीचे मुख्य पुजारी यांचे हस्ते पुजन करण्यात आले. ग्रामोपाध्ये केरबा उपाध्ये यांनी पंचांग वाचन केले. गुळलिंबाचे वाटप झाले .निनाम पाडळी (जि. सातारा), मौजे विहे (ता. पाटण), कसबे डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (ता. कऱ्हाड), छत्रपती (करवीर), कवठेगुलंद (सांगली), मनपाडळे (हातकणंगले), फाळकेवाडी, दरवेश पाडळी, सांगली, सातारा, कऱ्हाड, पंढरपूर, सोलापूर, बार्शी, लातूर आदी भागातील मानाच्या सासनकाठ्या उभ्या करून त्या त्या गावात जोतिबा चैत्र यात्रेसाठी केव्हा जायचे, याचे नियोजन केले.१२ एप्रिल रोजी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर डोंगरावर चैत्र यात्रेसाठी भाविक येण्यास प्रारंभ होईल. बेळगाव, कर्नाटक भागातील पायी, बैलगाड्या घेऊन येणारे भाविक डोंगरावर दाखल होतील. यात्रेचा मुख्य दिवस १६ एप्रिल आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा